मराठी बातम्या /बातम्या /मनी /

आता प्लॅटिनम घेण्याचं स्वप्न अधूरंच राहणार, केंद्र सरकारनं वाढवलं आयात शुल्क

आता प्लॅटिनम घेण्याचं स्वप्न अधूरंच राहणार, केंद्र सरकारनं वाढवलं आयात शुल्क

याआधी प्लॅटिनमवर 10.75 टक्के शुल्क लागू करण्यात आलं होतं. सप्टेंबर महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर आली.

याआधी प्लॅटिनमवर 10.75 टक्के शुल्क लागू करण्यात आलं होतं. सप्टेंबर महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर आली.

याआधी प्लॅटिनमवर 10.75 टक्के शुल्क लागू करण्यात आलं होतं. सप्टेंबर महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : प्लॅटिनम खरेदी करण्याचं स्वप्न असतं. प्लॅटिनमची ज्वेलरी घेणं म्हणजे आनंद काही वेगळाच असतो. मात्र आता प्लॅटिनमचे दागिने खरेदी करणं आवाक्याबाहेर जाणार आहे. केंद्र सरकारने यावरील आयात शुल्क वाढवलं आहे. सोमवारी सरकारने प्लॅटिनमवरील शुल्क वाढवलं असून ते 15.4 टक्के करण्यात आलं आहे.

याआधी प्लॅटिनमवर 10.75 टक्के शुल्क लागू करण्यात आलं होतं. सप्टेंबर महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर आली. यामध्ये सराफ ज्वेलर्स प्लॅटिनमच्या नावाखाली सोनं आयात करत असल्याचं समोर आलं. त्यामुळे प्लॅटिनमची आयात उच्च स्तरावर पोहोचली होती.

सरकारने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये काही लूपहोल होते. त्याचा फायदा सराफांनी उचलला. सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात प्लॅटिनमच्या नावावर सोनं आयात करण्यात आलं. सोन्यावर आयात शुल्क १५ टक्के आकारलं जातं. प्लॅटिनमवर कमी होतं. त्यामुळे सराफांनी ही युक्ती वापरली.

प्लॅटिनमच्या मागणीपेक्षा आयात दुप्पट झाल्याने याबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. केंद्र सरकारने सांगितलं होतं की कोणत्याही धातूमध्ये २ टक्क्यांहून अधिक प्लॅटिनम असेल तर त्याला प्लॅटिनम मानलं जाईल. या लूपहोलचा फायदा सराफांनी उचलला.

दुबईतील सोन्यामध्ये २ टक्के प्लॅटिनम मिश्रीत असतं. त्यामुळे तिथून सोनं मागवण्यात आलं. टॅक्स वाचवण्यासाठी ही युक्ती वापरण्यात आली. सणासुदीला सोन्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे फायदा सराफांना होणार आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर सरकारने तो लूपहोल सुधारला आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्क वाढवलं आहे.

First published: