Home /News /money /

Petrol Diesel Prices Hike : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचा भडका, आज पुन्हा दरवाढ

Petrol Diesel Prices Hike : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचा भडका, आज पुन्हा दरवाढ

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल आज पुन्हा वाढ केली आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशातील सर्व प्रमुख शहरांत किमती वाढल्या आहेत.

    नवी दिल्ली, 4 एप्रिल : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल आज पुन्हा वाढ (Petrol Diesel Prices Hike) केली आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशातील सर्व प्रमुख शहरांत किमती वाढल्या आहेत. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल किमतीत 40 पैसे प्रति लीटरची वाढ (Petrol Diesel Price Today) झाली आहे. दिल्लीत आता पेट्रोल 103.81 रुपये प्रति लीटर विक्री होत आहे. तर डिझेल 95 रुपये लीटर पार आहे. मुंबईत पेट्रोल 119 रुपयांजवळ पोहोचलं आहे. तर डिझेल 103 रुपयांहून अधिक महाग झालं आहे. मागील चार महिन्यांपासून इंधन दर स्थिर होता. परंतु निवडणुकांनंतर आता सरकारी तेल कंपन्यांनी दररोज पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यास सुरुवात केली. एका आठवड्याआधी जवळपास 137 दिवस इंधन दरात कोणतेही करण्यात आले नव्हते. मागील 10 दिवसांत जवळपास 7 रुपयांहून अधिक पेट्रोल महाग झालं आहे. तर डिझेल दरातही तितकीच वाढ झाली आहे. - दिल्लीत पेट्रोल 103.81 रुपये आणि डिझेल 95.07 रुपये प्रति लीटर – मुंबईमध्ये पेट्रोल 118.83 रुपये आणि डिझेल 103.07 रुपये प्रति लीटर – चेन्नईमध्ये पेट्रोल 109.34 रुपये आणि डिझेल 99.42 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 113.45 रुपये आणि डिझेल 98.22 रुपये प्रति लीटर

    हे वाचा - Petrol Diesel Price: देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात विकलं जातंय; काय आहे दर?

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या