Petrol Diesel Price: चोवीस दिवसांनंतर स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या आजचे दर

24 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवल्यानंतर आज अखेर तेल कंपन्यांनी दरात बदल (Petrol Diesel Price Today) केले आहेत. कंपन्यांनी आज सामान्य नागरिकांना दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी केल्या आहेत.

24 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवल्यानंतर आज अखेर तेल कंपन्यांनी दरात बदल (Petrol Diesel Price Today) केले आहेत. कंपन्यांनी आज सामान्य नागरिकांना दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी केल्या आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली 24 मार्च : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol Diesel Price) बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सरकारी कंपन्यांनी आज अनेक दिवसांनंतर सामान्य नागरिकांना दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी केल्या आहेत. 24 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवल्यानंतर आज अखेर तेल कंपन्यांनी दरात बदल (Petrol Diesel Price Today) केले आहेत. आज पेट्रोलच्या किमती 18 पैसे तर डिझेलच्या किमती 17 पैशांनी कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानं याचाच परिणाम देशातील पेट्रोल - डिझेलच्या किमतींवर झाला आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 15 दिवसात दहा टक्क्यांनी घसरल्या आहेत. यूरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्यानं इंधनाची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती 71 डॉलर प्रति बॅलरवरुन 64 डॉलरवर आल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये इतके होते दर - मागील महिन्यात 10 ते 26 फेब्रुवारी या काळात देशातील इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर 4 ते 5 रुपये प्रतिलीटरनं वाढवले होते. मात्र, 26 फेब्रुवारीनंतर क्रूड तेलाचे भाव 8 डॉलरहून अधिकनं वाढले आहेत. मात्र, यादरम्यान केवळ 27 फेब्रुवारीलाच काही प्रमाणात वाढ झाली आहे. रोज सकाळी सहा वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात. अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. BPCL कस्टमर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर तर एचपीसीएल कस्टमर HP Price लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Kiran Pharate
    First published: