Home /News /money /

ICICI बँकेचा ज्येष्ठ नागरिकांना दिलासा, सीनियर सिटीजन स्पेशल एफडी स्कीमला मुदतवाढ; कधीपर्यंत मिळणार फायदा?

ICICI बँकेचा ज्येष्ठ नागरिकांना दिलासा, सीनियर सिटीजन स्पेशल एफडी स्कीमला मुदतवाढ; कधीपर्यंत मिळणार फायदा?

आयसीआयसीआय बँकेपूर्वी, एचडीएफसी बँकेनेही ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटीझन केअर एफडी या विशेष योजनेची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे.

    मुंबई, 10 एप्रिल : HDFC नंतर आता ICICI बँक ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणार आहे. या खाजगी क्षेत्रातील बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी आपली 'गोल्डन इयर्स एफडी' (Golden Years FD) योजना 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवली आहे. आयसीआयसीआय बँकेने यापूर्वी 8 एप्रिल रोजी ही योजना बंद करण्याची घोषणा केली होती. RBI च्या धोरणात्मक दरांमध्ये बदल न करण्याच्या निर्णयाच्या एका दिवसानंतर ICICI बँकेने ही घोषणा केली आहे. ICICI बँकेने 20 मे 2020 रोजी व्याजदर कपातीमुळे प्रभावित झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी गोल्डन इयर्स FD नावाची विशेष मुदत ठेव (Fixed Deposit) योजना जाहीर केली होती. योजनेअंतर्गत, बँक 20 मे 2020 ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीत, नवीन ठेवी आणि नूतनीकरण ठेवींवर 0.25 टक्के अतिरिक्त व्याज दर वार्षिक 0.50 टक्के दराने ज्येष्ठ नागरिकांना देत होती. बँक 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर अतिरिक्त व्याज दर देत आहे. या कालावधीत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर 5.6 टक्के नियमित व्याजदर मिळतो, परंतु ज्येष्ठ नागरिकांना 6.35 टक्के व्याजदर मिळेल. याचा अर्थ गोल्डन इयर्स एफडी योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के जास्त व्याजदर मिळतो. इन्फोसिसच्या नारायण मूर्तींची मुलगी अक्षता ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत! कसे ते जाणून घ्या? आयसीआयसीआय बँकेपूर्वी, एचडीएफसी बँकेनेही ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटीझन केअर एफडी या विशेष योजनेची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना अशा FD वर 6.35 टक्के व्याजदर देखील देते. मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी दंड या योजनेंतर्गत एफडी करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांनी 5 वर्षांनी किंवा नंतर पैसे काढल्यास त्यांना 1.25 टक्के दंड भरावा लागेल . त्याच वेळी, ICICI बँकेचे विद्यमान मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम 5 वर्षे आणि 1 दिवसापूर्वी काढण्यावर लागू होतील. Rakesh Jhunjhunwala यांनी 'या' बँकेत वाढवली आपली हिस्सेदारी; वर्षभरात आधीच दिलाय 70 टक्के परतावा SBI Wecare मध्ये 6.3 टक्के व्याजदर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी विशेष FD योजना सुरू केली होती. त्यावेळी अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे व्याजदरांवर मोठा परिणाम झाला होता. SBI Wecare नावाच्या या योजनेचा कालावधी 5 ते 10 वर्षे आहे. बँक या कालावधीत 5.5 टक्के नियमित व्याज दर देते, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.3 टक्के व्याजदर आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Fixed Deposit, Icici bank, Investment

    पुढील बातम्या