मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Personal loan: ‘या’ गोष्टींसाठी कधीही घेऊ नका पर्सनल लोन, व्याज भरून व्हाल कंगाल

Personal loan: ‘या’ गोष्टींसाठी कधीही घेऊ नका पर्सनल लोन, व्याज भरून व्हाल कंगाल

Personal loan: ‘या’ गोष्टींसाठी कधीही घेऊ नका पर्सनल लोन, व्याज भरून व्हाल कंगाल

Personal loan: ‘या’ गोष्टींसाठी कधीही घेऊ नका पर्सनल लोन, व्याज भरून व्हाल कंगाल

Personal loan: तुम्हालाही पर्सनल लोन घेण्यासाठी बँकेकडून कॉल येत असतील. यामध्ये तुम्हाला पूर्व-मंजूर कर्जाची ऑफर दिली जाते. यासाठी तुम्हाला सुरक्षा म्हणून सोने, घर किंवा कार इत्यादी गहाण ठेवण्याची गरज नाही. अनेक वेळा लोक क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 24 जुलै : आपण अनेक कामांसाठी किंवा गरजांसाठी बँकेकडून कर्ज घेतो. तुम्हाला कार घ्यायची असेल तर कार कर्ज, घर घ्यायचं असेल तर गृहकर्ज, शिक्षण घ्यायचं असेल तर शैक्षणिक कर्ज अशी कर्ज आपण घेत असतो. याशिवाय बँका वैयक्तिक कर्जही (Personal loan) देतात. वैयक्तिक कर्ज हे अत्यंत असुरक्षित कर्ज आहे, असं मानलं जातं. इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज खूप महाग असतं. म्हणजेच तुम्हाला हे कर्ज जास्त व्याजदरानं मिळतं. अनेक परिस्थितींमध्ये, वैयक्तिक कर्जाचा व्याजदर (Interest Rate) 20 टक्क्यांच्या वर असतो. म्हणूनच अनेक तज्ञ काही विशिष्ट कामांसाठी वैयक्तिक कर्ज न घेण्याची (disadvantages of personal loan) शिफारस करतात.

तुम्हालाही पर्सनल लोन घेण्यासाठी बँकेकडून कॉल येत असतील. यामध्ये तुम्हाला पूर्व-मंजूर कर्जाची ऑफर दिली जाते. यासाठी तुम्हाला सुरक्षा म्हणून सोनं, घर किंवा कार इत्यादी गहाण ठेवण्याची गरज नाही. जर तुमचा CIBIL स्कोर चांगला असेल तर तुम्हाला हे कर्ज सहज मिळू शकते. अनेक वेळा लोक याच कारणासाठी वैयक्तिक कर्ज घेतात, कारण ते सहज उपलब्ध असतं.

वैयक्तिक कर्ज घेऊन मालमत्ता खरेदी करू नका-

अनेक वेळा लोक मालमत्ता (Property) खरेदी करताना डाउन पेमेंट करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतात. असं कधीही करू नये, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. वैयक्तिक कर्जामध्ये मालमत्ता खरेदी करण्यासाठी आवश्यक गोष्टींसह येत नाही. तसेच, त्याचा व्याजदरही खूप जास्त आहे. वैयक्तिक कर्ज खूप महाग असतं. त्यामुळं तुमचं कर्ज फेडण्यासाठी कधीही वैयक्तिक कर्ज घेऊ नका.

हेही वाचा- Pan Card: तुमच्याकडं पॅन कार्ड नाही? 'ही' 10 कामं करताना येईल अडचण

कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता-

अनेक वेळा लोक क्रेडिट कार्डचे बिल (Credit Card Bill) भरण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतात. कारण त्याचं व्याज खूप महाग असते. यामुळे, त्याचा हप्ताही तुमच्यासाठी अधिक असतं. अशा परिस्थितीत एकदाही हप्ता भरणं चुकलं तर बोजा वाढू शकतो. तसेच तुमचा CIBIL देखील खराब होऊ शकतो आणि तुम्ही कर्जाच्या जाळ्यातही अडकू शकता.

वैयक्तिक कर्ज घेऊन छंद जोपासू नका-

तुमचे छंद पूर्ण करण्यासाठी कधीही वैयक्तिक कर्ज घेऊ नका. महागडे मोबाईल आणि महागड्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी कधीही वैयक्तिक कर्ज घेऊ नका. तसेच वैयक्तिक कर्ज घेऊन शेअर बाजारात पैसे गुंतवू नका. तुम्ही गृहकर्ज किंवा कार लोन घेतल्यास, तुम्हाला ती विकून कर्ज फेडता येऊ शकतं. मात्र तुम्ही पर्सनल लोन घेऊन फिरायला गेलात आणि नंतर तुम्हाला ते फेडण्यात अडचणी येऊ लागल्या. तर अशा परिस्थितीत तुम्ही कर्जाच्या सापळ्यात वाईटरित्या अडकू शकता.

First published:

Tags: Instant loans, Loan