मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Personal Finance : Cancel Cheque देताना तुम्ही करताय का ही चूक?

Personal Finance : Cancel Cheque देताना तुम्ही करताय का ही चूक?

तुमचे सगळे डिटेल्स बँकेकडून कॅन्सल चेक का मागतात आणि तो देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुमचे सगळे डिटेल्स बँकेकडून कॅन्सल चेक का मागतात आणि तो देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुमचे सगळे डिटेल्स बँकेकडून कॅन्सल चेक का मागतात आणि तो देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई: नोकरी असो किंवा तुम्ही एखादा सेव्हिंगसाठी प्लॅन घेणार असाल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॅन्सल चेक द्यावा लागतो. तुम्ही कॅन्सल चेक देताना नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. नाहीतर नुकसान होऊ शकतं. अनेक वेळा तुम्हाला आर्थिक कामात कॅन्सल देण्याची गरज भासते. तुमचे सगळे डिटेल्स बँकेकडून कॅन्सल चेक का मागतात आणि तो देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या गोष्टी लक्षात ठेवा

हा चेक कोणत्याही व्यवहारासाठी वापरला जात नाही. या चेकवर मध्यभागी दोन तिरक्या रेषा मारून कॅन्सल असं लिहिलेलं असतं. हा चेक घेण्याचं कारण म्हणजे तुमचं अकाऊंट या चेकच्या मदतीनं व्हेरिफाय केलं जातं.

रद्द केलेल्या चेकवर सही करण्याची गरज नसते. त्यावर इतर कोणत्याही गोष्टी करू नयेत. चेकवर खाडाखोड करू नका. दोन तिरक्या रेषा मारून त्यावर फक्त कॅन्सल लिहायचं असतं. या चेकवर खात्याचा नंबर आणि IFSC कोड असतो. हा चेक लिहिताना नेहमी निळ्या पेनाचा वापर करावा. दुसऱ्या कोणत्याही रंगाच्या पेननं तो दिला तर कदाचित तो बाद धरला जाऊ शकतो.

या ठिकाणी Cancel चेक बंधनकारक

कार लोन, पर्सनल लोन, होम लोन घेता तेव्हा तुम्हाला कॅन्सल चेक देणं गरजेचं असतं. तुमचं खातं व्हेरिफाय करण्यासाठी तो चेक लागतो. PF मधून पैसे काढण्यासाठी देखील कॅन्सल चेकची गरज असते. Mutual Funds साठी देखील याची गरज भासते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असल्यास, कंपन्या रद्द केलेल्या चेकची माहिती विचारतात. याशिवाय विमा पॉलिसी घेतानाही याची गरज असते.

तुमचे एकापेक्षा जास्त बँकमध्ये Account आहेत? होऊ शकतं मोठं नुकसान

चेक देताना करू नका ही चूक

कॅन्सल चेक कोणालाही देऊ नका. त्यावर तुमच्या खात्याची माहिती असते. IFSC कोड आणि अकाऊंट नंबर असतो. त्यामुळे तुमची फसवणूक केली जाऊ शकते. कोणीही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे चुकूनही कॅन्सल चेकवर सही करू नका. सही केलेला चेक कॅन्सल चेक म्हणून देऊ नका. यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

Saving Account वर तुम्ही किती पैसे ठेवू शकता? टॅक्सचा नियम काय सांगतो?

कुठे-कुठे लागतो कॅन्सल चेक

डि मॅट खातं उघडण्यासाठी

बँकेच्या KYC साठी

विमा घेण्यासाठी

EMI साठी

म्युच्युअल फंडसाठी

बँकेतून लोन घेण्यासाठी

EPFO खात्यातून पैसे काढणे किंवा खातं उघडण्यासाठी

नोकरी बदलताना बँक खात्याचे डिटेल्स जमा करताना

First published: