जाहिरात
मराठी बातम्या / मनी / EPFOकडून सरकारी पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता घरबसल्या होईल 'हे' महत्त्वाचं काम

EPFOकडून सरकारी पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता घरबसल्या होईल 'हे' महत्त्वाचं काम

EPFOकडून सरकारी पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता घरबसल्या होईल 'हे' महत्त्वाचं काम

मोबाईल अॅपद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा ही एक ऑनलाइन सेवा आहे, जी सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 सप्टेंबर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सरकारी पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. EPFOने मोबाइल अॅप लॉन्च केले आहे. याद्वारे पेन्शनधारक आता कधीही त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी EPFO ​​ने फेस ऑथेंटिकेशन सेवा सुरू केली आहे. पेन्शनधारक Google Play Store वरून Aadhar FaceRD अॅप डाउनलोड करू शकतात. मोबाईल अॅपद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा ही एक ऑनलाइन सेवा आहे, जी सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारसोबतच इतर सरकारी संस्थांचे पेन्शनधारकही या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

ITR Refund: आयकर परतावा अजून आला नाही तर काय कारणं असू शकतात? चेक करा सद्यस्थिती

डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची प्रक्रिया » Google Play Store वरून Aadhar FaceRD अॅप डाउनलोड करा. » जीवन प्रमाण पोर्टलवरून फेस (अँड्रॉइड) अॅप ​​डाउनलोड करा. » Operator Authentication वर क्लिक करा. » पेन्शनर्स ऑथेंटिकेशन वर टॅप करा. » दिलेला पर्याय निवडा आणि तुमचा तपशील एंटर करा जसे की आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक इ. » त्यानंतर फेस ऑथेंटिकेशनसाठी येणाऱ्या ऑप्शनवर टॅप करा आणि तुमचे फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करा. » ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाईल. » कोणत्याही कारणास्तव अर्ज सादर केला नाही, तर त्याचा मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात