मराठी बातम्या /बातम्या /मनी /Paytm चं खास फीचर, विना इंटरनेट आणि फोन लॉक असतानाही होणार पेमेंट

Paytm चं खास फीचर, विना इंटरनेट आणि फोन लॉक असतानाही होणार पेमेंट

पेटीएमने गुरुवारी 'टॅप टू पे' नावाचे (Paytm 'Tap to Pay') नवीन फीचर लाँच केले आहे. या अंतर्गत Paytm युजर्सना पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची किंवा OTP टाकण्याची गरज नाही.

पेटीएमने गुरुवारी 'टॅप टू पे' नावाचे (Paytm 'Tap to Pay') नवीन फीचर लाँच केले आहे. या अंतर्गत Paytm युजर्सना पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची किंवा OTP टाकण्याची गरज नाही.

पेटीएमने गुरुवारी 'टॅप टू पे' नावाचे (Paytm 'Tap to Pay') नवीन फीचर लाँच केले आहे. या अंतर्गत Paytm युजर्सना पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची किंवा OTP टाकण्याची गरज नाही.

मुंबई, 7 डिसेंबर : कॅश पेमेंट ऐवजी डिजिटल पेमेंटचं (digital payment) प्रमाण आजकाल खुप वाढलं आहे. त्यामुळे अनेकजण खिशात रोख रक्कमही ठेवत नाहीत. मात्र इंटरनेट नसेल अशांची फजिती होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत अडचण येऊ नये म्हणून Paytm ने नवं फीचर आणलं आहे. Paytm च्या खास फीचरच्या मदतीने यूजर्स फोन बंद असतानाही इंटरनेटशिवाय सहज पेमेंट (Online payment without internet) करू शकतील. जाणून घेऊया या फीचरबद्दल...

पेटीएमचं नवीन फीचर

पेटीएमने गुरुवारी 'टॅप टू पे' नावाचे (Paytm 'Tap to Pay') नवीन फीचर लाँच केले आहे. या अंतर्गत Paytm युजर्सना पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची किंवा OTP टाकण्याची गरज नाही. त्याऐवजी, आता ते फक्त त्यांच्या फोनसह PoS मशीनला स्पर्श करून पैसे देऊ शकतात.

शेअर बाजारात स्टॉक निवडण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो; आर्थिक तोटा होणार नाही

लॉक न उघडता पेमेंट करता येते

खास बाब म्हणजे यासाठी यूजर्सना त्यांच्या फोनचे लॉकही उघडावे लागणार नाही. जरी त्यांच्या मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन किंवा मोबाईल डेटा नसला तरीही ते फक्त PoS मशीनला स्पर्श करून पेमेंट करू शकतात.

फीचर कसं काम करेल?

हे पेमेंट युजरच्या कार्डवरून केले जाईल, ज्यांचे तपशील पेटीएम अॅपमध्ये आधीच सेव्ह केले जातील. पेटीएमची 'टॅप टू पे' सेवा Android आणि iOS दोन्ही यूजरसाठी उपलब्ध आहे. या अंतर्गत, पेटीएमच्या ऑल इन वन पीओएससह, वापरकर्ते इतर बँकांच्या पीओएसवर देखील पेमेंट करू शकतील.

अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची चाल कशी असते? समजून घ्या आणि नियोजन करा

याप्रमाणे वापरू शकता

1. प्रथम 'टॅप टू पे' होम स्क्रीनवर "Add New Card" वर क्लिक करा किंवा कार्ड लिस्टमधून सेव्ह केलेले कार्ड निवडा.

2. आता कार्डशी संबंधित आवश्यक माहिती भरा.

3. यानंतर तुम्हाला टॅप टू पेशी संबंधित अटी आणि नियम 'Accept' करावे लागतील.

4. कार्डसोबत नोंदणीकृत तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आयडीवर OTP पाठवला जाईल.

5. OTP भरल्यानंतर, तुम्ही टॅप टू पे होम स्क्रीनच्या वर अॅक्टिव्हेट केलेले कार्ड पाहू शकता.

First published:

Tags: Online payments, Paytm