मराठी बातम्या /बातम्या /मनी /इंग्रजीही येत नव्हतं, आता आणतायेत सर्वात मोठा आयपीओ; Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मांचा प्रेरणादायी प्रवास

इंग्रजीही येत नव्हतं, आता आणतायेत सर्वात मोठा आयपीओ; Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मांचा प्रेरणादायी प्रवास

Vijay Shekhar Sharm यांनी 2000 मध्ये पेटीएमची मूळ कंपनी One97 सुरू केली. पेमेंट इकोसिस्टमची कल्पना त्यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा मांडली.

Vijay Shekhar Sharm यांनी 2000 मध्ये पेटीएमची मूळ कंपनी One97 सुरू केली. पेमेंट इकोसिस्टमची कल्पना त्यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा मांडली.

Vijay Shekhar Sharm यांनी 2000 मध्ये पेटीएमची मूळ कंपनी One97 सुरू केली. पेमेंट इकोसिस्टमची कल्पना त्यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा मांडली.

मुंबई, 28 ऑक्टोबर : "बडे से बडा बिझनेस पैसे से नही, एक बडे आयडिया से बडा होता है"... 2010 साली आलेल्या शाहिद कपूरच्या 'बदमाश कंपनी' सिनेमातील हा फेमस डायलॉग. आज हा डायलॉग आठवायचं कारण की, जर तुम्हाला इतरांपेक्षा जरा वेगळा विचार करुन एखादी आयडिया सुचली आणि त्याची योग्य अंमलबजावणी झाली तर काय होतं याचं मोठं उदाहरण म्हणजे Paytm. विजय शेखर शर्मा यांच्या पेटीएम (Paytm Founder Vijay Shekhar Sharma) कंपनीचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. आणि तो आजवरचा सर्वात मोठा आयपीओ  (Paytm IPO)असणार आहे. आता योगायोग असा की 2010 सालीच पेटीएमची स्थापना करुन जो डायलॉग शाहिदने सिनेमात म्हटला होता तो डायलॉग विजय शेखर यांनी खरा करुन दाखवला. मात्र त्यांचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता.

छोट्या शहरातून सुरु झालेला प्रवास

आज पेटीएम हे देशातील सर्वात लोकप्रिय मोबाइल अॅप्सपैकी (Mobile App) एक आहे. डिजिटल पेमेंटसाठी (Digital Payment) हे लोकांचे आवडते अॅप बनले आहे. हे अॅप तुम्हाला बहुतांश लोकांच्या स्मार्टफोनमध्ये आढळेल. विजय शेखर शर्मा हे एका छोट्या शहरातील एका साध्या कुटुंबातून आले आहेत. एक काळ असा होता की त्याच्या खिशात हातावर मोजण्याएवढे पैसे होते.

अजीम प्रेमजींनी यावर्षी दररोज 27 कोटी केले दान; कोण आहेत भारतातील टॉप 5 दानशूर?

विजय शेखर शर्मा हे उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील आहेत. फक्त 14 वर्षांचे होते तेव्हा ते 12वी उत्तीर्ण झाले. त्यांचे वडील शिक्षक होते. अतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी तो शिकवणी घेत असत. काहीतरी वेगळं करायचं म्हणून विजय शेखर छोटे शहर सोडून दिल्लीत गाठली आणि येथे त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला.

इंग्रजी येत नसल्याने अनेक अडचणी आल्या

विजय शेखर यांचं शालेय शिक्षण अलीगढमध्ये हिंदीमध्ये पूर्ण झाले. त्यामुळे कॉलेजमध्ये इंग्रजी येत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी पुस्तके, जुनी मासिके आणि मित्रांच्या मदतीने इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते एकाच पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्त्या एकत्र वाचत असत. मात्र, त्यासाठी जास्त वेळ जात होता. म्हणून वर्गात नेहमी अव्वल असणारे विजय शेखर शर्मा इतरांपेक्षा मागे पडू लागले.

Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीसह पुन्हा वधारला सोन्याचा भाव, तपासा आजचा दर

मित्रांनीही साथ सोडली

यासर्व गोष्टीमुळे ते काहीशे अस्वस्थ झाले होते आणि एक वेळ अशी आली की त्यांनी कॉलेजला जाणे बंद केले. कॉलेजच्या या वेळेचा उपयोग त्यांनी उद्योजक होण्यासाठी केला. त्यांना स्टॅनफोर्ड विद्यापीठात जायचे होते, परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आणि इंग्रजीच्या आव्हानांमुळे ते शक्य झाले नाही. कॉलेज सोबतच कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम सुरू केली. दरम्यान त्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीत पहिली नोकरीही सुरू केली. मात्र, सहा महिन्यांनी त्यांनी ती नोकरी सोडली आणि मित्रांसोबत स्वतःची कंपनी स्थापन केली. मात्र ज्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी व्यवसाय सुरू केला त्यांनी विजय शेखर यांची साथ सोडली, मात्र त्यांनी हार मानली नाही.

विजय शेखर शर्मा यांनी 2000 मध्ये पेटीएमची मूळ कंपनी One97 सुरू केली. पेमेंट इकोसिस्टमची कल्पना त्यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा मांडली. मात्र कंपनीच्या बोर्डाने ते मान्य केले नाही. त्‍यांनी त्‍यांच्‍या इक्विटीचा एक टक्‍का जो 2011 च्‍या वेळी सुमारे 15 कोटी रुपये होता तो समोर ठेवला आणि त्याबदल्यात वेबसाइट सुरू करण्याची विनंती केली. नुकसान झाल्यास जबाबदारी घेण्याचाही शब्द दिली. या विश्वासाने त्यांनी पेटीएम म्हणजेच Pay Through Mobile ची सुरुवात केली. आज या कंपनीबद्दल वेगळं सांगायची गरज नाही.

First published:

Tags: Investment, Money, Paytm Money