मुंबई, 12 जून : क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असाल आणि मिनिमम ड्यू अमाऊंट (Minimum Due Amount) भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मिनिमम ड्यू अमाऊंट भरणार्या ग्राहकांना असे करणे फायदेशीर वाटू शकते, परंतु जर तुम्ही असे केले तर तुम्ही स्वत:चं नुकसान करुन घेत आहात. असे केल्याने फायद्यापेक्षा तोटे जास्त आहेत. मिनिमम ड्यू अमाऊंट भरून, तुमची मोठी रक्कम भरण्याच्या ओझ्यातून बचत होते, थकबाकी भरण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ मिळतो, त्यामुळेच ही पद्धत ग्राहकांसाठी आकर्षक वाटते. पण त्याचे तोटेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून पेमेंटबाबत योग्य निर्णय घेता येईल. व्याजाचा भार वाढतो मिनिमम ड्यू अमाऊंट भरण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला उरलेली रक्कम भरावी लागणार नाही. तुम्हाला नंतर पूर्ण पेमेंट करावे लागेल. त्याचा तोटा असा आहे की थकबाकी भरण्यास जितका उशीर होईल तितका व्याजाचा बोजा वाढतो. गृहकर्जाचे व्याजदर वाढल्याने घरखर्चाचं बजेट कोलमडलं? EMI कमी करण्यासाठी काय करु शकता? व्याजमुक्त कालावधीचा देखील फायदा उपलब्ध नाही ग्राहकाने मिनिमम ड्यू अमाऊंट भरल्यास, पूर्ण रक्कम भरेपर्यंत व्याजाचा बोजा वाढतच राहतो. यासोबतच ग्राहकांना व्याजमुक्त कालावधीचा लाभ मिळत नाही, खरेदीच्या दिवसापासून व्याज सुरु होते. CIBILवर परिणाम होतो तज्ञांचे असे मत आहे की मिनिमम ड्यू अमाऊंट भरून, कर्जाची रक्कम एकतर राहते किंवा वाढतच राहते. भविष्यात तुम्ही संपूर्ण देय रक्कम भरली तरीही त्याचा परिणाम CIBILवर होतो. अशा परिस्थितीत, बँक तुम्हाला लिक्विडिटीची कमतरता असलेला ग्राहक म्हणून ओळखते. या परिस्थितीत CIBIL स्कोअर देखील खराब होतो. Bank of Baroda E-Auction: स्वस्त घर खरेदीची संधी, ‘या’ दिवशी लिलावात सहभागी व्हा क्रेडिट लिमिटही कमी होते मिनिमम ड्यु अमाऊंट भरत राहिल्याने क्रेडिट लिमीटवरही परिणाम होतो. मिनिमम अमाऊंट सतत भरल्यामुळे, जितकी कमी रक्कम दिली जाईल, तितकी क्रेडिट लिमिट कमी होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.