प्रतिनिधी अलोक प्रियदर्शनी, नवी दिल्ली : पॅनकार्ड असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही अजूनही पॅनकार्ड आधारला लिंक केलं नसेल तर तर वेळ आहे. आता दंड भरून तुम्ही लिंक करू शकता. हे जर तुम्ही केलं नाही तर मात्र तुमचं पॅनकार्ड अवैध ठरवलं जाणार आहे. याबाबत आता इनकम टॅक्स विभागाने अलर्ट जारी केला आहे.
CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी अनेक तारखा वाढवण्यात आल्या आहेत. हे महत्त्वाचे काम तुम्ही आजपर्यंत केले नसले तरी तुम्हाला संधी आहे. आयकर विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, आयकर कायदा 1961 नुसार, सर्व पॅन धारकांसाठी 31.3.2023 रोजी आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर पॅनकार्ड काही कामाचं उरणार नाही.
पॅन-आधार लिंक करण्याची तारीख अजून वाढलेली नाही. आयकर विभागाचे म्हणणे आहे की 31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास पॅन कार्ड रद्द मानले जाईल.
पॅन कार्डसोबत आधार लिंक करणे खूप सोपे आहे
आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/portal वेबसाइटवर जा. यानंतर, आधार लिंकचा पर्याय निवडा. इथे क्लिक करा आणि पॅन कार्ड तपशील अपडेट करा. जर तुम्हाला आधारशी पॅन कार्ड लिंक दिसली तर तुमचे पॅन आणि आधार लिंक झाले आहेत. पुढे क्लिक करा आणि पॅन कार्ड तपशील अपलोड करा.
जर तुम्हाला आधारशी पॅन कार्ड लिंक दिसली तर तुमचे पॅन आणि आधार लिंक झाले आहेत. ते तेथे दिसत असल्यास, तुम्हाला त्याच्याशी लिंक करणे आवश्यक आहे. https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या वेबसाइटवर जा आणि आधार लिंकचा पर्याय निवडा.
आयकर अधिनियम, 1961 के अनुसार, पैन को आधार से लिंक करने की अंतिम तिथि, उन सभी पैन धारकों के लिए जो छूट की श्रेणी में नहीं आते हैं, 31.3.2023 है। पैन को आधार से लिंक न करने पर पैन निष्क्रिय हो जाएगा। देर न करें, आज ही लिंक करें! pic.twitter.com/mrtqP7nqNL
— Income Tax India (@IncomeTaxIndia) November 18, 2022
यानंतर तुम्हाला आधार तपशील विचारला जाईल, त्यानंतर तुम्ही OTP पर्याय निवडा. यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा. विलंब शुल्क भरल्यानंतर, तुमचा पॅन आणि आधार लिंक केला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax, Pan Card, Pan card online