जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांचा डिस्काऊंटनंतरही खिसा कसा कापला जातो? सर्व्हेतून माहिती उघड

ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांचा डिस्काऊंटनंतरही खिसा कसा कापला जातो? सर्व्हेतून माहिती उघड

ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांचा डिस्काऊंटनंतरही खिसा कसा कापला जातो? सर्व्हेतून माहिती उघड

Online Food: रेस्टॉरंटमध्ये 100 रुपयांमध्ये तुम्ही जे डिश खाऊ शकता, त्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अॅपवर 110 ते 160 रुपये खर्च करावे लागतत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 ऑगस्ट : डिजिटलायझेशनच्या या युगात फक्त एका क्लिकवर सर्व काही उपलब्ध होत आहे. अशा अनेक सेवा आहेत, ज्यासाठी आधी स्वतः चालत बाजारात जावे लागत होते, आता त्या घरी बसून मिळतात. घरबसल्या ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याची सुविधा देखील त्यापैकीच एक आहे. तुम्हालाही ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याची सवय असेल काही गोष्टी तुम्ही समजून घ्यायला हव्या. एका सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, स्विगी आणि झोमॅटो सारख्या अॅप्सद्वारे ऑनलाइन फूड ऑर्डर करणे थेट रेस्टॉरंटमधून खरेदी करण्यापेक्षा 10 ते 60 टक्के महाग आहे. जेफरीज या आंतरराष्ट्रीय संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये देशभरातील 8 शहरांमधील 80 रेस्टॉरंटचा समावेश करण्यात आला आहे. जेफरीजच्या सर्वेक्षणानुसार, बहुतेक रेस्टॉरंट्समध्ये आणि ऑनलाइन दरांमध्ये बरीच तफावत आढळून आली आहे. रेस्टॉरंटमध्ये 100 रुपयांमध्ये तुम्ही जे डिश खाऊ शकता, त्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अॅपवर 110 ते 160 रुपये खर्च करावे लागतत. याद्वारे तुम्ही एका क्लिकवर फूड ऑर्डर बुक करणे तुमच्या खिशाला किती महागडे आहे हे समजू शकता. PF खात्यातून पैसे काढण्याची अट काय? एकावेळी किती पैसे निघतात? समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन फूड महाग असण्याची कारणे ऑनलाइन आणि ऑफलाइन खाद्यपदार्थांच्या ऑर्डरमधील तफावतीची तीन कारणे आहेत. यामध्ये रेस्टॉरंटद्वारे खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठीचे शुल्क, जाहिरात किंवा मार्केटिंग आणि रेस्टॉरंट-भागीदार अॅपसाठी कमिशन यांचा समावेश आहे. अनेक रेस्टॉरंट्स बिलामध्ये स्वतंत्रपणे पॅकिंग शुल्क देखील जोडतात. हे शुल्क बिलाच्या सुमारे 4 ते 5 टक्के आहे. डिलिव्हरी चार्ज डिलिव्हरी चार्ज देखील ग्राहकांकडून खाद्यपदार्थाच्या ऑनलाइन ऑर्डरसाठी आकारल्या जाणार्‍या अतिरिक्त रकमेत समाविष्ट केले जाते. ही रक्कम बिलाच्या एकूण रकमेच्या सुमारे 13 टक्के आहे. याशिवाय डिलिव्हरी अॅप आणि रेस्टॉरंटचे कमिशनही आधीच ठरवले जाते. कमिशनची रक्कम अॅपनुसार बदलते. Investment Tips: वाढत्या महागाईच्या काळात कशी करायची गुंतवणूक अन् बचत? या पाच टिप्स येतील कामी या सर्वेक्षणादरम्यान जेफरीजने देशातील विविध शहरांमधील रेस्टॉरंटमधून 120 रुपयांपासून 2800 रुपयांपर्यंतच्या 240 ऑर्डर्स दिल्या होत्या. यामध्ये 80 टक्के रेस्टॉरंटमधील ऑनलाइन आणि ऑफलाइन किमतीत मोठी तफावत आढळून आली. या सर्वेक्षणात जेफरीजने सांगितले की, अनेक ऑनलाइन अॅप्स आहेत जे डिस्काउंट देतात. यामध्ये सहसा 10 टक्क्यांपर्यंत सूट असते. परंतु ऑफलाइनच्या तुलनेत ते सुमारे 20 टक्के अधिक महाग आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: food , swiggy , Zomato
  • First Published :
जाहिरात
जाहिरात