मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेवटचे 3 दिवस बाकी, त्वरित जमा करा लाईफ सर्टिफिकेट, नाहीतर मिळणार नाही पेन्शन

शेवटचे 3 दिवस बाकी, त्वरित जमा करा लाईफ सर्टिफिकेट, नाहीतर मिळणार नाही पेन्शन

life certificate for pensioners

life certificate for pensioners

Life Certificate for Pensioners: पेन्शनधारक बँक आणि पोस्ट ऑफिसला वैयक्तिक किंवा ऑनलाइन भेट देऊन त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. याशिवाय पेन्शनधारक त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र मॅन्युअली किंवा डिजिटल पद्धतीने 5 इतर मार्गांनी सादर करू शकतात.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 27 नोव्हेंबर: सरकारी पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (Life ceftificate) सादर करण्याची अंतिम मुदत हळूहळू जवळ येत आहे. हे प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. मासिक पेन्शनचा लाभ नियमितपणे मिळण्यासाठी सर्व पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे जीवन प्रमाणपत्र बँका आणि पोस्ट ऑफिस यांसारख्या पेन्शन वितरण प्राधिकरणांकडे सादर करावं लागतं.

पेन्शनधारकांची इच्छा असल्यास ते बँक आणि पोस्ट ऑफिसला वैयक्तिकरित्या किंवा ऑनलाइन भेट देऊन त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. या व्यतिरिक्त पेन्शनधारक त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र मॅन्युअली किंवा डिजिटल पद्धतीनं सबमिट करू शकतात. ते सादर करण्याचे 5 मार्ग आपण जाणून घेऊया:

पोर्टलच्या माध्यमातून सादर करा जीवन प्रमाणपत्र-

पेन्शनधारक त्यांचे जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन जीवन प्रमाण पोर्टल/अ‍ॅपद्वारे सबमिट करू शकतात. यासाठी निवृत्तीवेतनधारकांना UIDAIनं दिलेल्या सुचनेनुसार  अधिकृत डिव्हाईसच्या माध्यमातून बोटांचे ठसे द्यावे लागतील.

जीवन माणपत्र तयार करण्यासाठी, पेन्शनधारकांना प्रथम जीवन सन्मान पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. यासाठी त्यांना जीवन प्रमाण अॅप डाउनलोड करून ओपन करावं लागेल. त्यानंतर नवीन नोंदणीचा ​​पर्याय निवडा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, नाव, मोबाइल क्रमांक आणि पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) टाका.

हेही वाचा: केवळ 1 रुपयांत फ्लाइट तिकीट देतंय 'हे' अ‍ॅप! काय आहे प्रोसेस? वाचा सविस्तर

फेस अ‍ॅपद्वारे सादर करा जीवन प्रमाणपत्र-

सरकार पेन्शनधारकांना आधार डेटाबेसवर आधारित फेस अ‍ॅप तंत्रज्ञान प्रणाली वापरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येते. यासाठी Google Play Store वर जाऊन AadhaarFaceID अ‍ॅप डाउनलोड करा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही jeevanpramaan.gov.in वरून फेस अ‍ॅप डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुमचा नवीन फोटो सबमिट करा आणि नंतर डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवा.

 डोअरस्टेप बँकिंग-

डोअरस्टेप बँकिंग अलायन्सद्वारे जीवन प्रमाणपत्र देखील सादर केलं जाऊ शकतं. या सेवेसाठी नाममात्र शुल्क भरावं लागेल. त्यानंतर संबंधित अधिकारी पेन्शनधारकाच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करेल. पब्लिक सेक्टरमधील 12 बँकासमवेत काही अन्य बँका देशभरात 100 प्रमुख शहरांमध्ये आपल्या ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंग सुविधा प्रदान करतात.

पोस्टमनच्या माध्यमातून सादर करता येईल जीवन प्रमाणपत्र-

पोस्ट विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं (MeitY) पोस्टमनद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी घरोघरी सेवा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकाला Google Play Store वरून Postinfo अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल.

बँक किंवा पोस्ट ऑफिस-

निवृत्तीवेतनधारक PDA समोर स्वतः उपस्थित राहून पेन्शन डिसबर्सिंग अथॉरिटी (PDA) बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र मिळवू शकतात.

First published:

Tags: Pension, Pensioners