जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ऑनलाईन व्यवहार करताना 'या' टिप्स लक्षात ठेवा, तुमचे बँकेतील पैसे राहतील सुरक्षित

ऑनलाईन व्यवहार करताना 'या' टिप्स लक्षात ठेवा, तुमचे बँकेतील पैसे राहतील सुरक्षित

ऑनलाईन व्यवहार करताना 'या' टिप्स लक्षात ठेवा, तुमचे बँकेतील पैसे राहतील सुरक्षित

UPI फसवणुकीच्या घटना रोज समोर येत आहेत. मात्र, सर्वसामान्यांनी सतर्क राहिल्यास ते फसवणुकीचा बळी होण्यापासून वाचू शकतो, असे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 एप्रिल : आजकाल ऑनलाइन पैशाचे व्यवहार (Online transaction) वाढत आहेत. ऑनलाइन व्यवहार करणे देखील खूप सोपे आहे कारण ते मोबाईलवर काही क्लिकवर पूर्ण केले जाऊ शकतात. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हे कॅशलेस आणि ऑनलाइन पेमेंटचे (Online Payment) सर्वात लोकप्रिय माध्यम बनले आहे. पण, ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर वाढला की, त्यावरील फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहे. UPI इकोसिस्टम देखील घोटाळ्यांपासून दूर राहिलेली नाही. UPI फसवणुकीच्या घटना रोज समोर येत आहेत. मात्र, सर्वसामान्यांनी सतर्क राहिल्यास ते फसवणुकीचा बळी होण्यापासून वाचू शकतो, असे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुन्हेगार फक्त यूजर्सच्या लोभाचा किंवा निष्काळजीपणाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करतात. त्यामुळे UPI चा वापर जपून करावा आणि काही गोष्टी नेहमी पाळल्या पाहिजेत. तुमचा UPI आणि पिन कधीही शेअर करु नका तुमची UPI आणि पिन माहिती कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. तुम्हाला कॉल करणारी किंवा मेसेज करणारी व्यक्ती स्वत:ला सरकारी संस्था किंवा बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगत असली तरीही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बँका, सरकारी संस्था आणि कंपन्या कधीही UPI पिन मागत नाहीत. सहसा, फसवणूक करणारे खाते बंद होण्याची भीती दाखवून किंवा अॅप अपडेट करण्याचे नाटक करून यूजर्सना पिन मागतात. त्यामुळे जर कोणी तुम्हाला तुमचा पिन विचारत असेल तर त्यांना कधीही सांगू नका. बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतील तरी वेळप्रसंगी काढता येतील 10,000 रुपये; काय आहे सरकारची सुविधा?   फक्त वेरिफाय अॅप्स वापरा तुमच्या स्मार्टफोनवर कोणतेही अॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी ते वेरिफाय आहे की नाही याची खात्री करा. अज्ञात वेबसाइटवरून अॅप्स डाउनलोड करू नका. तुम्ही फायनान्शिअल अॅप किंवा गेम डाउनलोड करत असलात तरी ते नेहमी Google Play Store, Window App Store किंवा Apple App Store सारख्या अधिकृत स्टोअरमधून डाउनलोड करा. बहुतेक UPI अॅप्समध्ये स्पॅम फिल्टर असते. ते अशा UPI आयडीचा मागोवा घेतात ज्यातून वारंवार पेमेंट रिक्वेस्ट पाठवल्या जातात. जर तुम्हालाही अशा आयडीकडून रिक्वेस्ट येत असेल तर अॅपचा स्पॅम फिल्टर तुम्हाला याबाबत सावध करेल. त्यामुळे अॅपच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. रिक्वेस्ट पाठवताना कोणतीही फसवणूक होणार नाही याची 100 टक्के खात्री असतानाच अशा रिक्वेस्टवर व्यवहार करा. जर तुम्हाला थोडीशी शंका असेल तर रिक्वेस्ट रिजेक्ट करा. लोभी होऊ नका बक्षिसे, कॅशबॅक किंवा पैसे देण्याचे आमिष दाखवणाऱ्या अशा कोणत्याही वेबसाइटवर कोणतेही व्यवहार करू नका. फक्त तुमचा UPI-PIN मिळवण्यासाठी अशा साइट्स तुम्हाला प्रत्येक चांगल्या ऑफर देतील. तुम्ही अशा साइट्सवर व्यवहार केल्यास ते तुमचे खाते त्वरित रिकामे करतील. रेल्वे तिकीट बुकिंग व्यतिरिक्त IRCTC च्या इतर सुविधांबद्दल माहितीये का? चेक करा डिटेल्स UPI पिन बदलत राहा तुमचे खाते सुरक्षित ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे तुमचा UPI पिन बदलत राहणे. शक्य असल्यास, दर महिन्याला तुमचा UPI पिन बदला. तीन महिन्यांनंतर, कोणत्याही परिस्थितीत UPI पिन बदलला पाहिजे. तोच पिन बराच काळ वापरल्याने सायबर गुन्हेगारांच्या हाती लागण्याची शक्यता वाढते. संशयास्पद लिंक्स किंवा एसएमएस उघडू नका ऑनलाइन गुन्हेगार यूपीआय यूजर्सना लिंक किंवा एसएमएस पाठवून फसवतात. अशा लिंक्समध्ये अनेकदा प्रलोभने दिलेली असतात. ते लॉटरीशी संबंधित असू शकतात किंवा त्यांना परदेशात चांगल्या नोकरीचे आमिष दाखवले जाते. तुम्ही या लिंक्सवर क्लिक केल्यास, ते तुम्हाला फिशिंग वेबसाइटवर घेऊन जातील, जिथे तुमच्या UPI खात्याशी संबंधित माहिती चोरली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात