जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 5 दिवस 5 मोठे निर्णय, ज्याचा तुमच्या आयुष्यावर होणार मोठा परिणाम

5 दिवस 5 मोठे निर्णय, ज्याचा तुमच्या आयुष्यावर होणार मोठा परिणाम

5 दिवस 5 मोठे निर्णय, ज्याचा तुमच्या आयुष्यावर होणार मोठा परिणाम

महागाई कमी होण्याचं नाव घेत नाही. त्याच दरम्यान आता 5 दिवस 5 मोठ्या घटना घडणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: महागाई कमी होण्याचं नाव घेत नाही. त्याच दरम्यान आता 5 दिवस 5 मोठ्या घटना घडणार आहेत. याचा थेट परिणाम भारतातील बाजारपेठेवर आणि सर्वसामान्य लोकांवर होणार आहे. 4 सप्टेंबर रोजी क्रूड उत्पादनवर ओपेक प्लसची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. उत्पादन घटवण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता आहे. 5 डिसेंबर रोजी रशियाकडून क्रूड ऑईल घेणाऱ्यांसाठी प्राइस कॅप लागू होणार आहे. यामध्ये एकूण 67 देशांचा समावेश असेल. त्यात भारत देखील आहे. त्यामुळे रशियाला ठरलेल्या किंमतीपेक्षा जास्त क्रूड ऑईल विकता येणार नाही आणि इतर देशांना ते खरेदी करता येणार नाही. हे नियमाचं उल्लंघन असणार आहे. 7 डिसेंबर रोजी आरबीआयच्या क्रेडिट पॉलिसीसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर येऊ शकते. यासोबत पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. 0.25 ते 0.35 टक्क्यांपर्यंत रेपो रेट वाढण्याची शक्यता आहे. 14 डिसेंबरला US फेडर बँक पुन्हा व्याजदर वाढवू शकतं असा अंदाज आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय घोषणा करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे. शेअर बाजार चढतो किंवा घसरतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य गुंतवणूकदारांवर होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात