धमाका ऑफर! Vivo चा फोन झाला तब्बल 7,500 रुपयांनी स्वस्त

धमाका ऑफर! Vivo चा फोन झाला तब्बल 7,500 रुपयांनी स्वस्त

स्वस्तात मस्त फोन घेण्याची खास संधी...

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी : वीवोच्या बजेट फोनवर आता भरघोस सूट मिळत आहे. अमेझॉनच्या ऑफिशिअल पेजवरुन याची माहिती देण्यात आली. अमेझाननं दिलेल्या माहितीनुसार एक्सचेंज ऑफरमध्ये ही सूट मिळत आहे. वीवोचा U20 (vivo U20) या फोनवर ही सूट देण्यात येत आहे. या फोनची मूळ किंमत 10,990 रुपये एवढी आहे. या कंपनीनं हा फोन 4जीबी 64जीबी आणि 6 जीबी 64 जीबी अशा दोन व्हेरियंटमध्ये बाजारात आणला आहे. यातील 4जीबी 64जीबी हा फोन 10,990 रुपयांना तर 6 जीबी 64 जीबीचा फोन 11,990 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.

अमेझॉनवर सुरू असलेल्या एक्सचेंज ऑफरमध्ये मात्र या दोन्ही फोनवर 7,500 रुपयांची सूट देण्यात येत आहे. याशिवाय Yes Bank च्या क्रेडिट कार्ड EMI मध्ये 1,750 रुपयांपर्यंतचं त्वरित डिस्काउंट मिळणार आहे.

Vivo U20 चे फिचर्स

वीवो U20 मध्ये 6.53 इंच FHD प्लस ‘हालो फुलव्यू डिस्प्ले’ देण्यात आला आहे. तसेच AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 16 मेगापिक्सल सोबत 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सॉर देण्यात आला आहे. तर फ्रंट कॅमेरामध्ये वीवो U20 ला 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.

वीवो U20 स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसरवर काम करतो. जे या सेगमेंटमधील फोनमध्ये शक्यतो पाहायला मिळत नाही. वीवोचा हा फोन Android 9 Pie वर बेस्ड फनटच ओएस 9.2 वर चालतो. पॉवरसाठी या फोनमध्ये 5000mAh पॉवरची बॅटरी देण्यात आली. या फोनसोबत 18 वॅट फास्ट चार्जर देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2020 09:57 AM IST

ताज्या बातम्या