मुंबई, 10 सप्टेंबर : डिजिटल आणि ऑनलाइन बँकिंगच्या (Online Banking) युगात ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत. दररोज एक नागरिक या फसवणुकीचा बळी ठरतो. थोडीशी चूक किंवा निष्काळजीपणामुळे बँक खात्यात जमा झालेले लाखो रुपये काही सेकंदात गायब होतात. ऑनलाइन बँकिंग फसवणूक ही जगभरातील एक मोठी समस्या होत चालली आहे. त्यामुळे खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुम्हीही डिजिटल बँकिंग सेवा वापरत असाल, तर त्यातील तांत्रिक बाबी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून ऑनलाइन व्यवहार काळजीपूर्वक करता येतील. सायबर गुन्हेगारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही खालील पद्धती वापरू शकता. पासवर्ड बनवताना काळजी घ्या डिजिटल बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मोबाईल किंवा संगणकावर तुमच्या खात्यात ऑनलाइन लॉग इन करावे लागते. त्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे. पासवर्ड बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमचा पासवर्ड खूप मजबूत असावा जेणेकरून कोणालाही तो सहज हॅक करता नाही. यामध्ये जन्मतारीख, तुमचे नाव आणि मोबाईल नंबर कधीही वापरू नये. कारण असे पासवर्ड सहज शोधता येतात. वाचा - प्रॉपर्टीवर जास्तीत-जास्त रिटर्न हवाय? ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या अज्ञात लिंकवर क्लिक करू नका अनेकदा आपल्याला मोबाईलवर मेसेज आणि ई-मेल्समध्ये काही अज्ञात लिंक्स मिळतात, ज्यात आकर्षक ऑफर्स आणि कॅशबॅकचे आश्वासन दिले जाते. तुम्ही जाहिरात पाहून या लिंक्सवर क्लिक केल्यास तुमच्या बँक खात्याची किंवा एटीएम कार्डची अधिक माहिती विचारली जाते. जर तुम्ही याचे उत्तर दिले तर तुम्ही बँकिंग फसवणुकीचे बळी व्हाल. त्यामुळे या लिंक्सवर क्लिक करणे टाळलेलेच बरे. व्हेरिफाइड बँकिंग अॅप डाउनलोड करा मोबाइलवर ऑनलाइन बँकिंग वापरण्यासाठी नेहमी संबंधित बँकेचे अॅप्लिकेशन वापरा. Play Store वरून बँकिंग अॅप डाउनलोड करण्यापूर्वी, ते तपासा आणि केवळ व्हेरिफाइड अॅप डाउनलोड करा. कारण येथे अनेक बनावट अॅप्लिकेशन सक्रिय आहेत, ज्यावर लॉग इन केल्यानंतर, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या ठगांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचते. यानंतर तुम्ही काही मोठ्या फसवणुकीचे बळी होऊ शकता. सार्वजनिक वायफाय आणि सायबर कॅफेद्वारे कोणतेही व्यवहार करू नका देशातील अनेक सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय उपलब्ध आहे आणि इंटरनेट डेटा वाचवण्यासाठी लोक या मोफत वायफायचा वापर करतात. यादरम्यान बँकेचे व्यवहारही या माध्यमातून केले जातात. वास्तविक यापैकी काही वायफाय सेवा बनावटही असू शकतात. त्यामुळे, जर तुम्ही या सर्वांचा वापर करून बँकिंग व्यवहार करत असाल, तर त्यासंबंधीची गोपनीय माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचते आणि तुम्ही बँकिंग फसवणुकीला बळी पडू शकता. याशिवाय, बँकिंग व्यवहारादरम्यान मोबाइलवर मिळालेला ओटीपी कोणाशीही शेअर करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.