मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कांदा रडवणार का? किमतींना लगाम लावण्यासाठी सरकार आखतंय या योजना; वाचा सविस्तर

कांदा रडवणार का? किमतींना लगाम लावण्यासाठी सरकार आखतंय या योजना; वाचा सविस्तर

देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव (onion price hike in India) वाढल्याने आता केंद्र सरकारने (central government) हे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारने अशा राज्यांना बफर स्टॉक देण्यास सुरुवात केली आहे, जिथे कांद्याचे भाव वाढत आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी: देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव (onion price hike in India) वाढल्याने आता केंद्र सरकारने (central government) हे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारने अशा राज्यांना बफर स्टॉक देण्यास सुरुवात केली आहे, जिथे कांद्याचे भाव वाढत आहेत. बाजारात बफर स्टॉकची (Onion Buffer Stock) झपाट्याने आवक झाल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर होताना दिसत आहेत.

कांद्याचे भाव वाढणं हे अनेकवेळा सरकारसाठी अडचणीचं ठरतं. त्यामुळे यंदा बाजारात कांद्याचा कमी पुरवठा (supply of onions) पाहता भाव वाढ होऊ नये, यासाठी सरकारने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. आतापासूनच योजनाबद्ध पद्धतीने अशा राज्यांना कांद्याचा बफर स्टॉक उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे, जेथे मागील महिन्यांच्या तुलनेत कांद्याच्या किंमती वाढू लागल्या आहेत.

भाव नियंत्रणासाठी सरकार उचलत आहे पावलं

बाजारातील कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'महाराष्ट्रातील लासलगाव घाऊक कांदा मार्केट (Lasalgaon Wholesale Onion Mandi) आणि पिंपळगाव घाऊक बाजारात (Pimpalgaon Wholesale Onion Mandi) बफर स्टॉक करण्यात आलाय. साठवणुकीव्यतिरिक्त इतर ठिकाणी 21 रुपये प्रति किलो दराने कांदा राज्यांना देण्यात आला आहे. हा कांदा मदर डेअरीच्या यशस्वी विक्री केंद्रांनाही वाहतूक खर्चासह 26 रुपये प्रति किलो दराने पुरवठा करण्यात आला आहे.'

हे वाचा-महिन्याला 300 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवू शकता 10लाखांचा मोठा फंड,पाहा डिटेल्स

किरकोळ बाजारात वाढत आहेत किमती

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून किरकोळ बाजारात कांद्याचे भाव (Onion Retails Price) हळूहळू वाढत आहेत. दिल्ली आणि चेन्नईमध्ये कांद्याचा भाव 37 रुपये प्रति किलो, मुंबईत 39 रुपये आणि कोलकात्यात 43 रुपये प्रति किलो होता. खरीप हंगामातील (उन्हाळी) कांद्याची आवक स्थिर असून रब्बी पीकही मार्च 2022 पासून बाजारात येण्यास सुरुवात होईल. यावर्षी 17 फेब्रुवारीपर्यंत कांद्याची अखिल भारतीय सरासरी किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत 22.36 टक्क्यांनी कमी होती.

महिनाभरात बटाट्याचे दर घसरले

ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे म्हणणे आहे की, 'मागील महिन्याच्या तुलनेत 17 फेब्रुवारी रोजी बटाट्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 6.96 टक्के कमी म्हणजे 20.58 रुपये प्रति किलो होती. टोमॅटोचे दरसुद्धा गेल्या महिनाभरात घसरले आहेत. पण ते अजूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहेत. 1 फेब्रुवारीपर्यंत टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किंमत 26.69 रुपये प्रति किलो होती, जी मागील महिन्याच्या तुलनेत कमी आहे. उत्तर भारतात आवक वाढल्याने येत्या आठवड्यात भाव आणखी घसरतील. दक्षिण भारतातही टोमॅटोची आवक येत्या आठवड्यात वाढणार असून या महिन्याच्या अखेरीस ती वेगाने सुरू होईल.

हे वाचा-ABG Shipyard Scam मुळे मोठ्या खासगी बँकेचा फटका; कुणी दिलं सर्वाधिक कर्ज?

महागाईने अगोदरच नागरिक वैतागले आहेत. त्यातच आता स्वयंपाकघरात, हॉटेलमध्ये दररोज लागणाऱ्या कांद्याच्या किंमतीही सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या आहेत. या किंमती नियंत्रणात राहाव्यात, यासाठी सरकारने वेळीच पावलं उचलली आहेत. आता याचा सामान्य नागरिकांना कितपत फायदा होतो, हे पाहावं लागेल.

First published:

Tags: Onion