मराठी बातम्या /बातम्या /मनी /OMG! 50 हजाराच्या iPhoneची 52 लाखांना विक्री, असं काय आहे खास?

OMG! 50 हजाराच्या iPhoneची 52 लाखांना विक्री, असं काय आहे खास?

iphone

iphone

या फोनचा लिलाव करण्यात आला. या फोनला जेवढी बोली लागली ती किंमती ऐकून तुमचे डोळेच विस्फारतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : आताच्या आलेल्या नव्या आयफोनची किंमतही तेवढी नसेल जेवढी या आयफोनला मिळाली आहे. आयफोन 14 प्रोपेक्षा कित्येकपट जास्त किंमतीला आयफोनचा फर्स्ट जनरेशनचा फोन विकला गेला आहे. या फोनचा लिलाव करण्यात आला. या फोनला जेवढी बोली लागली ती किंमती ऐकून तुमचे डोळेच विस्फारतील.

जगातील सर्वात हायटेक, आलिशान आणि चांगल्या मोबाईल फोनमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं अशाअॅपल आयफोनची युजर्समध्ये प्रचंड क्रेझ आहे. सध्या बाजारात या ब्रँडचा iPhone 14 हा सर्वात महागडा आणि नवीन फोन आहे. Apple देखील लवकरच नवीन मॉडेल iPhone 15 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Apple IPhone Discount : आयफोन घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण, इथे मिळेल मोठा डिस्काउंट

मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार आता ऑनलाइन लिलावात जुन्या फॅक्टरी सीलबंद आयफोनसाठी 63,356.40 डॉलरची बोली लागली आहे. जर आपण भारतीय चलनात ही किंमत मोजली तर ही किंमत साधारण 52.4 लाख रुपये होते असं म्हणायला हरकत नाही.

अॅपल इनसाइडरकडून मिळालेल्या माहितीनुसार, या फोनच्या मालकाचे नाव कॅरेन ग्रीन आहे. हा फोन त्याला त्याच्या मित्रांनी भेट म्हणून दिला होता. जरी हा फोन फक्त AT&T मोबाईल नेटवर्कला सपोर्ट करतो. जेव्हा त्याला फोन भेट देण्यात आला.

त्यावेळी या फोनची किंमत नाही म्हटलं तरी साधारण 50 हजार रुपये होती. विशेष म्हणजे हा फोन वापरलेला नाही. तर जसा गिफ्ट मिळाला तसा अनबॉक्स फोन आहे.  अर्थात त्यावेळी कॅरेन ग्रीन व्हेरिझॉन वापरत होते, त्यामुळे त्यांनी हा फोन तसाच स्टोअरमध्ये ठेवून दिला आणि नंतर लिलावासाठी काढला.

आयफोन बनवणारी फॉक्सकॉन कंपनी भारतात वाढवतेय विस्तार; नोकरीसह कर्मचाऱ्यांना `या` खास सुविधा

2019 मध्ये ग्रीन यांनी या फोनचं मूल्य 5000 डॉलर असल्याचं सांगितलं. त्यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी हा फोन लिलावामध्ये काढला. सुरुवातीला त्यांना 2,500 डॉलर किंमत ठेवली आणि नंतर ती वाढवत नेली. आता या फोनसाठी तब्बल भारतीय रुपयात 52 लाख रुपयांची बोली लागली आहे.

First published:
top videos

    Tags: Apple, Iphone