जाहिरात
मराठी बातम्या / मनी / राष्ट्रीय पेन्शन योजनेत बचतीचे आहेत अनेक फायदे, तुम्हाला माहिती आहे का?

राष्ट्रीय पेन्शन योजनेत बचतीचे आहेत अनेक फायदे, तुम्हाला माहिती आहे का?

राष्ट्रीय पेन्शन योजनेत बचतीचे आहेत अनेक फायदे, तुम्हाला माहिती आहे का?

रिटायरमेंटनंतर योग्य ठिकाणी बचत करणं गरजेचं असतं. सध्या मोठ्या संख्येने लोक राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एनपीएसमध्ये बचत करत आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 26 डिसेंबर : रिटायरमेंट अर्थात सेवानिवृ्त्तीनंतरचा आर्थिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी बहुतांश लोक नोकरीदरम्यान आर्थिक नियोजन सुरू करतात. यासाठी ते एफडी, आरडी, म्युच्युअल फंडासारखे पर्याय निवडतात. भारतात शासकीय नोकरदारांना पेन्शनचा लाभ मिळतो. पण खासगी नोकरदार वर्गाला पेन्शन मिळत नाही. त्यामुळे खासगी नोकरदार बचत, गुंतवणुकीवर भर देत आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करतात. रिटायरमेंटनंतर पैशांची कमतरता भासू नये, कुटुंबातील व्यक्तींवर पैशांसाठी अवलंबून राहावं लागू नये, यासाठी सध्या बहुतांश नोकरदार राष्ट्रीय पेन्शन सिस्टीमअंतर्गत असलेल्या योजनेत अर्थात एनपीएसमध्ये बचत करताना दिसतात. सुरुवातीला ही योजना केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती. पण आता ती सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. या योजनेत बचत करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे या योजनेत बचत केल्यास तुम्हाला करसवलतदेखील मिळते. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया. `आज तक`ने याबाबतची माहिती दिली आहे. भारतातील नोकरदार 50 ते 65 वर्षादरम्यान निवृत्त होतात. बहुतांश लोक नोकरीदरम्यान सेवानिवृत्तीनंतरचे प्लॅनिंग सुरू करतात. यात आर्थिक नियोजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. खरं तर रिटायरमेंटनंतर योग्य ठिकाणी बचत करणं गरजेचं असतं. सध्या मोठ्या संख्येने लोक राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एनपीएसमध्ये बचत करत आहेत. एनपीएस हा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. सुरुवातीच्या काळात एनपीएस ही केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच होती; पण नंतरच्या काळात ही योजना सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. या योजनेत दोन प्रकारची अकाउंट तुम्ही सुरू करू शकता. या योजनेत तुम्हाला बचतीसाठी टिअर -1 आणि टिअर -2 असे दोन पर्याय मिळतात. एनपीएसमध्ये 18 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्ती बचत सुरू करू शकतात. हेही वाचा :  Money Tips: बंद झालेलं NPS खातं पुन्हा कसं सुरू करायचं? जर तुम्हाला एनपीएसमध्ये बचत सुरू करायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम टिअर -1मधील अकाउंट सुरू करावं लागेल. त्यानंतर तुम्ही टिअर -2 अकाउंट सुरू करू शकता. एनपीएस टिअर -1 हे रिटायरमेंटच्या अनुषंगानं डिझाइन केलं आहे. तुम्ही 500 रुपये बचत करून हे अकाउंट सुरू करता येते. रिटायरमेंटनंतर तुम्ही एनपीएसच्या टिअर -1 अकाउंटमधून एकावेळी 60 टक्क्यांपर्यंत रक्कम सहज काढू शकता.उर्वरित 40 टक्के रकमेतून तुम्हाला एन्युटीज खरेदी करावी लागते. एन्युटीची रक्कम तुम्हाला दरमहा पेन्शन स्वरूपात दिली जाते. एनपीएस टिअर -2 अकाउंट हे बचत खात्याप्रमाणे असते. हे अकाउंट सुरु करण्यासाठी तुम्ही सुरूवातीला किमान 1000 रुपयांची बचत करावी लागते. या अकाउंटमध्ये तुम्ही केव्हाही कितीही प्रमाणात रक्कम भरू शकता आणि गरजेनुसार रक्कम काढू शकता. आवश्यकता असेल तर तुम्ही एकावेळी सर्व रक्कमदेखील या अकाउंटमधून काढू शकता. टिअर -2 अकाउंटमध्ये तुम्ही एका वर्षात पैसा जमा करण्यास बांधील नसता. मात्र एनपीएस टिअर -1मध्ये तुम्हाला वर्षातून एकदा पैसे जमा करावे लागतात. हेही वाचा :  Fixed Deposit: 700 दिवसांच्या एफडीवर ‘ही’ बँक देतीये तगडा व्याजदर, वाचा संपूर्ण माहिती टिअर -1 आणि टिअर -2 या दोन्ही अकाउंटमुळे मिळणाऱ्या करसवलतीत मोठा फरक असतो. टिअर-1 अकाउंट होल्डरला आयकर प्राप्तीकर कायदा 80 C अंतर्गत 1.5 लाख रुपये आणि 80 CCD (1B) अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर कपातीचा लाभ मिळतो. मात्र एनपीएस टिअर -2अकाउंट होल्डर कोणत्याही प्रकारची करसवलत मिळत नाही. केवळ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एनपीएस टिअर -2 अकाउंटवर कर सवलत मिळते. पण त्यासाठी काही अटी असतात. सरकारी कर्मचाऱ्यांना कर सवलतीचा लाभ मिळण्यासाठी बचतीच्या रकमेवर तीन वर्षांचा लॉकिंग कालावधी असतो. एनपीएस टिअर -1 अकाउंटमधून काढलेली संपूर्ण रक्कम करमुक्त असते. मात्र एनपीएस टिअर -2 अकाउंटमधून काढलेली संपूर्ण रक्कम करपात्र असते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात