जाहिरात
मराठी बातम्या / मनी / गुडन्यूज! 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर भरावा लागणार नाही कर, सरकारचा काय आहे प्लॅन?

गुडन्यूज! 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर भरावा लागणार नाही कर, सरकारचा काय आहे प्लॅन?

गुडन्यूज! 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर भरावा लागणार नाही कर, सरकारचा काय आहे प्लॅन?

गुडन्यूज! 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर भरावा लागणार नाही कर, सरकारचा काय आहे प्लॅन?

Budget 2023: वैयक्तिक आयकर प्रणालीत केंद्र सरकार करमुक्त स्लॅब वाढविण्याचा विचार करीत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 डिसेंबर: सामान्य माणसाच्या इतर आवश्यक गोष्टींप्रमाणे आयकर खूप महत्वाचा आहे. 2023 च्या अर्थसंकल्पाची सरकारची तयारी (बजेट 2023) सुरू झाली आहे आणि यावेळी सरकार कर स्लॅबमध्ये बदल करण्याची अपेक्षा आहे. मागील बजेटच्या बैठकीच्या सुरूवातीस त्यात सुधारणा करण्याची मागणी होत होती. केंद्र सरकार वैयक्तिक आयकर प्रणालीत करमुक्त स्लॅब वाढविण्याचा विचार करीत आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, करदात्याच्या वार्षिक करपात्र उत्पन्नास  2.50 लाख रुपये असल्यास कोणताही कर भरावा लागत नाही. कर-मुक्त स्लॅबची व्याप्ती वाढविण्यामुळे करदात्यांवरील कराचं ओझे कमी होईल आणि योग्य खर्च करण्यासाठी किंवा गुंतवणूकीसाठी अधिक पैसे वाचतील. ते म्हणाले की, फारच कमी करदात्यांनी वैकल्पिक कर प्रणालीची निवड केली आहे. जर करदात्यांनी कलम 80 सी, कलम 80 डी सारख्या कर सूटीचा फायदा घेतला तर जुन्या वैयक्तिक आयकर प्रणालीतील कर देयता कमी होईल. परंतु नवीन सिस्टममध्ये कोणत्याही कपातीचा फायदा नाही. खूप कमी लोकांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे, त्यामुळं हे पाऊल उचललं जात आहे.  कर -संबंधित अजेंडा पुढील आठवड्यापासून सुरू होईल- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुद्दा आगामी बजेटच्या तयारी दरम्यान उपस्थित केला गेला जाईल आणि संबंधित विभागांना सिस्टममध्ये सुधारण्याच्या पद्धती सुचविण्यास सांगितलं गेलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की बजेट बनवण्याच्या अभ्यासानुसार, कर -संबंधित अजेंडा पुढील आठवड्यापासून सुरू होईल, जिथे आम्ही कर आकारणी प्रणालीत अशा बदलांची शक्यता पाहू. ते असंही म्हणाले की अशा कोणत्याही प्रस्तावाचा विचार करता, या बदलामुळे एकूण उत्पन्नावर किती परिणाम होईल हे निश्चितपणे दिसून येईल आणि आमच्याकडे तसं करण्यासाठी वाव आहे. ते म्हणाले की, नवीन व्यवस्थेअंतर्गत करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवल्यामुळं महसुलावर काय परिणाम होऊ शकतो,याचा प्रारंभिक अंदाज घेण्यात येत आहे. हेही वाचा:  तुमचं बँक अकाउंट बंद होणार की नाही? इथे चेक करा आताच यासारखे नवीन कर स्लॅबचा विचार करा- आपण नवीन कर स्लॅब पाहिल्यास कर दर कमी ठेवला गेला आहे. नवीन कर स्लॅब जुन्या स्लॅबपेक्षा भिन्न आहे. यात कमी दरासह अधिक स्लॅब आहेत. पण जुन्या कर स्लॅबच्या तुलनेत विविध प्रकारची सूट आणि कपातीचा लाभ कमी करण्यात आले आहेत. या प्रणालीमध्ये ज्यापद्धतीनं उत्पन्नात वाढ होते, त्यानुसार कर स्लॅब वाढतो आणि या क्रमानं कर दायित्व देखील वाढतं. 2.5 लाखांपर्यंत कमाईवर शून्य कर, 2.5-5 लाखांवर 5% (87 ए अंतर्गत सूट), 5-7.5 लाखांवर 10%, 7.5-10 लाखांवर 15%, 10-12.5 लाखांवर 20%, 12.5-15 लाखांवर 25%, 15 लाखाहून अधिक उत्पन्नावर 30% कर द्यावा लागेल. जुना कर स्लॅब- जुन्या कर स्लॅबमध्ये, 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर जमा करावा लागत नाही. याशिवाय कलम 80c सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर कर जमा करण्यास सूट देण्यात आली आहे. त्यानुसार करदात्यांना सुमारे साडेसहा लाखांच्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही. ओल्ड टॅक्स रेजिम किंवा जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये इनकट टॅक्स रेट मुख्यतः तुमचं उत्पन्न आणि उत्पन्नावर स्लॅबवर आधारित असतो. यामध्ये वय देखील आधार बनविला जातो.

News18लोकमत
News18लोकमत

2.5 लाखांपर्यंत- 0% 2.5 लाख ते 5 लाख- 5% 5 लाख ते 10 लाख- 20% 10 लाखाहून अधिक- 30%

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax , Tax
  • First Published :
जाहिरात
जाहिरात