मुंबई, 6 नोव्हेंबर: जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करत असाल आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पोस्ट ऑफिसने आपल्या बचत बँक योजनेसाठी ई-पासबुक सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा सुरू केल्यानंतर, पोस्ट ऑफिस बचत खातेधारक त्यांच्या पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या पासबुकमध्ये ऑनलाइन प्रवेश करू शकतील. ई-पासबुक सुविधा सुरू केल्यानंतर पोस्ट ऑफिस बचत बँक योजना अधिक डिजिटल होण्याची अपेक्षा आहे, कारण खातेदार त्यांच्या आवडीच्या कोणत्याही कालावधीसाठी व्यवहारांचे विवरण तपासू शकतील. यामुळे खातेदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्वी ग्राहकांना फक्त मिनी स्टेटमेंट पुरते मर्यादित होते. आता पोस्ट ऑफिस बचत खातेधारक त्यांच्या खात्याचे तपशील सहजपणे पाहू शकतील आणि आता त्यांना त्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ही ‘ई-पासबुक सुविधा’ सुरू केल्याने, पोस्ट ऑफिस बचत बँक खातेधारकांना केवळ मिनी स्टेटमेंटऐवजी संपूर्ण बँक पासबुकमध्ये पाहता येईल. अशा परिस्थितीत काही स्टेप्सचे अनुसरण करून ते ऑनलाइन तपासले जाऊ शकते. दुसरीकडे, इंडिया पोस्टचे ग्राहक इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे त्यांच्या खात्यात प्रवेश करू शकतात. तथापि पोस्ट ऑफिस बचत खात्यात ऑनलाइन प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे नोंदणीकृत नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग असणे आवश्यक आहे. या स्टेप्स करा फॉलो-
- पोस्ट ऑफिस अॅपमध्ये लॉग इन करा,
- मोबाईल बँकिंग वर जा.
- तुमच्या खात्याची माहिती भरा.
- ‘गो’ बटणावर क्लिक करा.
हेही वाचा: Home Loan: ‘या’ 5 बँका देतायेत सर्वात स्वस्त गृहकर्ज, चेक करा लेटेस्ट रेट
- तुम्हाला पोस्ट ऑफिस अकाउंट डॅशबोर्डवर पुनर्निर्देशित केले जाईल.
- येथे तुम्हाला बॅलन्स आणि स्टेटमेंट तपासण्याचा पर्याय मिळेल.
- स्टेटमेंट वर क्लिक करा.
- तुम्हाला मिनी स्टेटमेंट आणि अकाउंट स्टेटमेंटचा पर्याय मिळेल.
- स्टेटमेंट पर्यायावर क्लिक करा.
- ज्या कालावधीसाठी तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिस खात्याचे पासबुक तपशील पहायचे आहेत तो कालावधी निवडा.
- स्टेटमेंट डाउनलोड करा किंवा भविष्यातील वापरासाठी सेव्ह करा
याशिवाय ग्राहक कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी कस्टमर केअर नंबरवर कॉल करू शकतात. 1800-425-2440 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुम्ही खात्याशी संबंधित माहिती मिळवू शकता. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. याशिवाय, तुम्ही dopebanking@indiapost.gov.in वर मेल देखील करू शकता.

)







