नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : तुम्ही देखील गॅस सिलेंडरचे बुकिंग ऑनलाइन (Gas Cylinder Online Booking) करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन बुकिंग करू शकाल त्याचबरोबर कॅशबॅक देखील मिळेल. जर तुम्ही Amazon Pay च्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे बुकिंग केले तर तुम्हाला 50 रुपयाचे कॅशबॅक मिळेल. पहिल्या बुकिंगवरच हा कॅशबॅक मिळणार आहे. जाणून घ्या या ऑनलाइन बुकिंग संदर्भात - Indane ने ट्वीट करून दिली माहिती सरकारी तेल कंपनी इंडनने (Indane) याबाबत ट्वीट करून त्यांच्या ग्राहकांना माहिती दिली आहे. घरगुती गॅस सिलेंडर घेणारे ग्राहक Amazon Pay च्या माध्यमातून हे बुकिंग करू शकतात, अशी माहिती कंपनीने दिली आहे. इंडेन रिफेलसाठी देखील तुम्ही ऑनलाइन बुकिंगचा पर्याय वापरू शकता. पहिल्यांदा हे बुकिंग केल्यावर तुम्हाला 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
You can now book and pay for your #Indane refill through amazon pay and get flat Rs.50 cashback on your first transaction. #LPG #InstantBooking pic.twitter.com/hJm96fYz2L
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) October 29, 2020
अशाप्रकारे करा बुकिंग यासाठी तुम्हाला अॅमेझॉन अॅपच्या पेमेंटच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्ही गॅस सर्व्हिस प्रोव्हायडर निवडा आणि याठिकाणी रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक, एलपीजी क्रमांक टाका. यानंतर तुम्ही पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करू शकता. इंडेनने रीफिलसाठी जारी केला नवा नंबर तुम्ही जर इंडेनचे ग्राहक असाल तर तुम्ही जुन्या क्रमांकावरून आता एलपीजी गॅसचे बुकिंग करू शकणार नाही. इंडेनने त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर बुकिंगचा नवा क्रमांक पाठवला आहे. (हे वाचा- चहाप्रेमी हा चहा घेणार का? 75000 रुपये किलोने झाली विक्री, वाचा काय आहे खासियत ) याआधी इंडियन ऑइलने अशी माहिती दिली होती की, घरगुती गॅस बुकिंगसाठी देशात वेगवेगळ्या सर्कलसाठी वेगवेगळे मोबाइल क्रमांक आहेत. आता देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम कंपनीने सर्वांसाठी एकच नंबर जारी केला आहे. इंडेनच्या देशभरातील ग्राहकांसाठी एलपीजी बुक करण्यासाठी 7718955555 या क्रमांकावर कॉल किंवा एसएमएस करावा लागेल. डिलिव्हरीसाठी OTP सुविधा सिलेंडरची डिलिव्हरी घेताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. या नवीन प्रणालीला DAC असे नाव देण्यात आले आहे, म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (Delivery Authentication Code). आता केवळ सिलेंडर बुक केल्यानंतर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळणार नाही, तर तुमच्या रजिस्टर्ड फोन क्रमांकावर एक कोड पाठवला जाईल. डिलिव्हरी बॉय तुमच्या सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन आल्यावर तुम्हाला त्याला हा कोड सांगावा लागेल. (हे वाचा- गुंतवणुकीसाठी आजही FDला अधिक पसंती,जाणून घ्या 1 वर्षाच्या एफडीवरील बेस्ट व्याजदर ) त्यानंतरच तुम्हाला तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी दिली जाईल. तेल कंपन्या हा प्रयोग सुरुवातीला 100 स्मार्ट सिटीजमध्ये लागू करणार आहे. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल. यामध्ये कमर्शिअल गॅसचा समावेश नाही आहे.