मुंबई, 8 नोव्हेंबर: तुमच्या घरात कुणी पेन्शनधारक व्यक्ती असेल किंवा तुम्ही स्वतः पेन्शनधारक असाल, तर पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागेल. पण आता तुम्ही घरबसल्या तुमच्या अँड्रॉईड फोनच्या मदतीनं तुमचं जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करू शकता. चे फेस रेकग्निशन पद्धतीनं तुम्ही तुमचं जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सहजपणं सबमिट करू शकता. ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र कसं सादर करायचं याची संपूर्ण माहिती आज आपण देणार आहोत.
अँड्रॉइड फोनवरून असं जमा करा जीवन प्रमाणपत्र-
हेही वाचा: ‘या’ क्षुल्लक चुकीमुळं फेटाळला जाईल Insurance Claim, होईल लाखोंचं नुकसान
ही सुविधा का सुरू केली?
खरंतर निवृत्तीवेतनधारकांसाठी फेस रेकग्निशन सेवेची सुविधा आणण्यात आली आहे, कारण बहुतेक पेन्शनधारक हे त्या वयाचे आहेत जेथे त्यांना पेन्शन कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यातील अनेक पेन्शनधारकांची शारीरिक स्थितीही चांगली नसते. तसेच हे पेन्शनधारक आजारी असतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भारत सरकारनं आधार कार्डचा डाटाबेस वापरून पेन्शनधारकांसाठी फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी सुविधा सुरू केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pension, Pensioners