मुंबई, 8 नोव्हेंबर: कोणतंही वाहन चालवायचं असेल तर विमा असणं आवश्यक आहे. काही लोक ट्रॅफिक पोलिस आणि चलन टाळण्यासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतात. अपघात झाल्यास त्यांना क्लेम मिळणं कठीण जाते. खरंतर यात गाडीची दुरुस्ती नाही, तर त्यात बसलेल्या लोकांच्या सुरक्षेचा हा विमा आहे. याशिवाय शुन्य टक्के विमा असूनही कंपनी काही लोकांना क्लेम देण्यास नकार देते. यामागे अनेक कारणे आहेत. बेदरकारपणे वाहन चालवल्यानं अपघात होत आहेत. जर चालकाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल किंवा तो दारूच्या नशेत असेल तर तो कोणत्याही प्रकारे विम्याचा दावा करू शकत नाही. वैध परवान्यासह वाहन चालवा- काही लोक आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी गाडी चालवायला देतात. एखाद्याकडे वाहन चालवन्याचा परवाना नसेल किंवा त्याची वैधता संपली असेल तर अपघात झाल्यास विमा कंपनी थेट इन्शुरन्स क्लेम करण्यास थेट नकार देतात. दुसरीकडे, कार शिकवताना अपघात झाल्यास तुम्ही क्लेम घेऊ शकत नाही. परवान्याची वैधता संपल्यानंतरही वाहन चालविल्यास क्लेम नाकारला जाऊ शकतो. विमा स्वतःच्या नावावर करून घ्या- सेकंड हँड कार खरेदी केल्यानंतर काही लोक ती आपल्या नावावर न करताच चालवतात. अशी चूक कधीही करू नका. ते विकत घेतल्यानंतर तुमच्या नावावर नक्की करा. केवळ आरसी हस्तांतरित केल्यावर विम्याचा दावा करता येत नाही. यासाठी विमा आरसी आणि इतर सर्व कागदपत्रे तुमच्या नावावर करा. हेही वाचा: तुमची कार विकण्याची वेळ तर आली नाही ना? समजून घ्या सोप्या शब्दात सीएनजी किट माहिती- याशिवाय, पेट्रोल वाहनात स्वतंत्र सीएनजी किट किंवा एलपीजी किट बसवल्यानंतर त्याची नोंदणी न केल्यास विमा कंपनी क्लेम देत नाही. म्हणून अशी किट बसवल्यास त्याची नोंदणी करा. त्यानंतर त्याची नोंदणी केल्याबद्दल बिमा कंपनीला कळवा आणि इन्शुरन्स कव्हर लेटरवर देखील त्याचा उल्लेख करा. दारू पिऊन गाडी चालवू नका- अपघाताच्या वेळी चालक नशेत असेल तर विमा कंपनीही दावा नाकारते. विमा कंपनी कोणत्याही परिस्थितीत याची जबाबदारी घेत नाही. त्यामुळं कोणत्याही प्रकारची नशा करून वाहन चालवू नका.
खाजगी कारचा व्यावसायिक वापर- वाहन खाजगी वापरासाठी आहे की व्यावसायिक आहे याची थेट माहिती विमा आणि आरसीवर असते. व्यावसायिक कामकाजादरम्यान खाजगी वाहनाचा अपघात झाल्यास विमा कंपनी त्यासाठीही दावा देत नाही. त्याच वेळी तुमची कार नो पार्किंगमध्ये उभी असेल आणि तिचं नुकसान झालं, तर त्यावेळी देखील क्लेम केला जात नाही. तसेच अपघातानंतर 48 ते 72 तासांच्या आत अपघाताची माहिती विमा कंपनीला देणे आवश्यक आहे.

)







