मराठी बातम्या /बातम्या /मनी /क्या बात है! आता तुम्ही अवघ्या 15 वर्षांत होऊ शकता करोडपती; 'या' SIP मध्ये करा गुंतवणूक

क्या बात है! आता तुम्ही अवघ्या 15 वर्षांत होऊ शकता करोडपती; 'या' SIP मध्ये करा गुंतवणूक

आपलं आर्थिक उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी दर वर्षी एसआयपीमधल्या गुंतवणुकीची रक्कम हजाराच्या पटीत वाढवणं आवश्यक असतं.

आपलं आर्थिक उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी दर वर्षी एसआयपीमधल्या गुंतवणुकीची रक्कम हजाराच्या पटीत वाढवणं आवश्यक असतं.

आपलं आर्थिक उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी दर वर्षी एसआयपीमधल्या गुंतवणुकीची रक्कम हजाराच्या पटीत वाढवणं आवश्यक असतं.

    मुंबई, 14 ऑगस्ट: प्रत्येकाला आपण करोडपती (Crorepati) व्हावं, असं वाटत असतं. अनेक जण त्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. करोडपती होण्यासाठी नोकरी-व्यवसायात भरपूर परिश्रम करणं हे जसं महत्त्वाचं असतं, तसंच योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने गुंतवणूक (Investment) करणंदेखील गरजेचं असतं. उत्पन्नाच्या आधारे नियोजनबद्ध पद्धतीने पैशांचं नियोजन केल्यास तुम्ही हळूहळू करोडपती होण्याच्या दिशेनं वाटचाल करू शकता. करोडपती बनण्यासाठी केवळ बचतच नाही तर सातत्याने गुंतवणूक करणं गरजेचं आहे. गुंतवणुकीसाठी तुम्ही म्युच्युअल फंडाच्या (Mutual Fund) सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानची (SIP) निवड केली असेल, तर त्याला आणखी एका गोष्टीची जोड देणं आवश्यक आहे. आपलं आर्थिक उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी दर वर्षी एसआयपीमधल्या गुंतवणुकीची रक्कम हजाराच्या पटीत वाढवणं आवश्यक असतं. यालाच स्टेपअप SIP (Step up SIP) असं म्हणतात. याचा फायदा कसा होतो, जाणून घेऊ या. याबाबतचं वृत्त `मनी 9 हिंदी`ने दिलं आहे.

    एखादी व्यक्ती गुंतवणूक करताना सिपमधली रक्कम मॅन्युअली वाढवू शकते. तुम्ही स्टेपअप सिपचा पर्याय निवडलात तर सिपची रक्कम दर वर्षी आपोआप वाढत राहील. तसंच ही बाब तुम्ही शिस्तबद्ध गुंतवणूकदार असल्याचं अधोरेखित करेल.

    हे वाचा - फ्री मध्ये फिरा गोवा आणि मालदीव, 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी आणि बरंच काही

    लहान रकमेपासून सुरुवात करून, कालांतराने पद्धतशीर बचत वाढवायची आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी आणि त्यातही पगारदार वर्गासाठी स्टेपअप SIP हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. कारण वर्षानुवर्षं गुंतवणूक केल्यानं त्यांच्या उत्पन्नात अधिक वाढ होऊ शकते. काही वेळा ठरवलेल्या वर्षांत आवश्यक रक्कम आपण गुंतवू शकतोच असं नाही. त्यामुळे दर वर्षी ही रक्कम वाढवत राहणं फायदेशीर ठरू शकतं, असं इक्विरस वेल्थचे सीईओ अंकुर माहेश्वरी यांनी सांगितलं. दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीचा स्वयंचलित दृष्टिकोन हाच याचा सर्वांत मोठा फायदा आहे. तसंच यामुळे बचतीचं नियोजन वेळेवर आणि कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय होतं, असंही माहेश्वरी यांनी स्पष्ट केलं.

    आता याचं उदाहरणच द्यायचं झालं, तर असं देता येईल. तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात (Equity Mutual Fund) 10 टक्के चक्रवाढ वार्षिक वृद्धीदर गृहीत धरून दरमहा 10 हजार रुपये गुंतवत असाल, तर तुम्हाला 1 कोटी रुपये जमा होण्यासाठी 20 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागेल. परंतु, तुम्ही गुंतवणुकीची रक्कम दर वर्षी तीन हजार रुपयांनी वाढवली, तर 15 वर्षांतच तुमच्याकडे 1 कोटी रुपये अगदी सहज जमा होतील. स्टेपअप सिपमध्ये 12 महिन्यांसाठी मूलभूत एसआयपी (Basic SIP) रक्कम 10 हजार रुपये असेल, तर त्यानंतर 13 व्या महिन्यापासून पुढील 12 महिन्यांसाठी तुम्ही 13 हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. तिसऱ्या वर्षी 16 हजार रुपयांचे 12 हप्ते असतील. त्यानंतर त्याच्या पुढील वर्षासाठी 19 हजार रुपये एकूण 15 वर्षांपर्यंत. अशा पद्धतीने 15 वर्षांत तुम्ही 1.03 कोटी रुपये जमा करू शकता आणि करोडपती बनू शकता. म्युच्युअल फंड स्कीम 12 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न देत असेल तर तुम्ही यापेक्षाही लवकर 1 कोटी रुपये मिळवू शकता.

    First published:

    Tags: Investment, Money