मराठी बातम्या /बातम्या /मनी /फ्री मध्ये फिरा गोवा आणि मालदीव, 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी आणि बरंच काही; काय आहे ऑफर?

फ्री मध्ये फिरा गोवा आणि मालदीव, 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी आणि बरंच काही; काय आहे ऑफर?

तुम्ही सुट्टीसाठी एखाद्या सुंदर ठिकाणी जाण्याचं नियोजन (Holiday Plan) करत असाल, तर तुम्ही गोवा आणि मालदीवला भेट देऊ शकता, तेसुद्धा अगदी मोफत.

तुम्ही सुट्टीसाठी एखाद्या सुंदर ठिकाणी जाण्याचं नियोजन (Holiday Plan) करत असाल, तर तुम्ही गोवा आणि मालदीवला भेट देऊ शकता, तेसुद्धा अगदी मोफत.

तुम्ही सुट्टीसाठी एखाद्या सुंदर ठिकाणी जाण्याचं नियोजन (Holiday Plan) करत असाल, तर तुम्ही गोवा आणि मालदीवला भेट देऊ शकता, तेसुद्धा अगदी मोफत.

    नवी दिल्ली, 14 ऑगस्ट: तुम्ही सुट्टीसाठी एखाद्या सुंदर ठिकाणी जाण्याचं नियोजन (Holiday Plan) करत असाल, तर तुम्ही गोवा आणि मालदीवला भेट देऊ शकता, तेसुद्धा अगदी मोफत. पूर्वी गो-एअर (Go Air) नावाने ओळखली जाणारी आणि आता गो फर्स्ट (Go First) असं नाव असलेल्या विमान वाहतूक या कंपनीने स्वातंत्र्यदिन (Independence Day) आणि रक्षाबंधन (Raksha Bandhan) या सणांच्या निमित्ताने आपल्या ग्राहकांना विशेष ऑफर दिली आहे. या ऑफरअंतर्गत प्रवाशांना गोवा आणि मालदीवमध्ये एक ऑल इन्क्लुझिव्ह पेड हॉलिडे (All-inclusive paid holiday) जिंकण्याची संधी आहे. 15 आणि 22 ऑगस्ट रोजी गो फर्स्ट कंपनीच्या विमानातून प्रवास करणाऱ्यांना ही संधी मिळू शकते.

    बक्षीस जिंकलेल्यांना या एअरलाइन्सकडून कुटुंबातल्या 4 सदस्यांना गोवा आणि 2 जणांना मालदीवला जाण्याची संधी दिली जाईल. जे 15 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट रोजी गो फर्स्ट फ्लाइटने प्रवास करतील, तेच या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतील. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनाच्या दिवशी गो फर्स्टच्या विमानातून प्रवास करणाऱ्यांना आणखीही काही बक्षीसं मिळू शकतात.

    अशी आहे ऑफर

    कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, की ‘15 ऑगस्ट रोजी गो फर्स्ट कंपनीच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी भाग्यवान प्रवाशांना गोव्यात एक ऑल इन्क्लुझिव्ह पेड हॉलिडे जिंकण्याची संधी आहे. ही ऑफर 2 कपल्स जिंकू शकतात. यामध्ये रिटर्न फ्लाइट, गोव्यातल्या नोवोटेल गोवा डोना सिल्विया बीच रिसॉर्ट येथे 2 रात्री 3 दिवस मुक्काम, एयरपोर्ट ट्रान्सफर्स, ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण यांचा समावेश आहे.’

    22 ऑगस्ट रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी भाग्यवान प्रवाशाला मालदीवचा पेड हॉलीडे (All-inclusive paid holiday) जिंकण्याची संधी आहे. एक कपल हा हॉलिडे जिंकू शकतं. यात रिटर्न फ्लाइट (डायरेक्ट सेक्टर), कोर्नाड मालदीव रंगिली रेसिडेन्सच्या अंडर-सी रेसिडेन्समध्ये 3 रात्री 4 दिवस मुक्काम, सीप्लेन एअरपोर्ट ट्रान्सफर, ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जेवण यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कपल मालदीवमध्ये असताना त्यांना मोफत मॅट्रिक्स आंतरराष्ट्रीय प्रीपेड सिम कार्डदेखील मिळू शकतं.

    विविध गिफ्ट्स

    गो फर्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौशिक खोना यांनी म्हटलं आहे, की ‘भारत स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात प्रवेश करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. गो फर्स्ट 15 ऑगस्टला सर्व प्रवाशांना मिठाई, स्नॅक्स आणि पेय वाटून हा उत्सव साजरा करील. 15A नंबरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला द गुड लाइफ कंपनीकडून विशेष भेट मिळेल. त्याचप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशी कंपनीकडून मुलांना भेटवस्तू, राखी आणि चॉकलेट देण्यात येईल.

    First published:

    Tags: Goa, Maldivs