Home /News /money /

पेट्रोल-डिझेल दरवाढीला सरकार नव्हे, तर 'ही' गोष्ट जबाबदार; नितीन गडकरींनी सांगितलं कारण

पेट्रोल-डिझेल दरवाढीला सरकार नव्हे, तर 'ही' गोष्ट जबाबदार; नितीन गडकरींनी सांगितलं कारण

इंधन दरवाढीमुळे (Price Hike) सरकारला देशातल्या जनतेच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे. अनेक ठिकाणी विरोधी पक्षांनी तर पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात निदर्शनं सुरू केली आहेत

मुंबई 26 मार्च : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol-diesel Prices) सातत्यानं वाढ होत आहे. याशिवाय एलपीजी सिलिंडरचे (LPG Cylinder) दरदेखील वाढवण्यात आले आहेत. इंधन दरवाढीमुळे (Fuel Price Hike) सरकारला देशातल्या जनतेच्या नाराजीला सामोरं जावं लागत आहे. अनेक ठिकाणी विरोधी पक्षांनी तर पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात निदर्शनं सुरू केली आहेत; मात्र सत्ताधारी पक्षातल्या अनेक नेत्यांनी या दरवाढीचं समर्थन केलं आहे. यामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचाही समावेश होतो. गडकरींनी गेल्या चार दिवसांत तीन वेळा झालेल्या इंधन दरवाढीचं समर्थन केलं आहे. 'रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine War) सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ही परिस्थिती भारत सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे,' असं त्यांनी शुक्रवारी (25 मार्च) सांगितलं. Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 5 दिवसात चौथ्यांदा वाढ; जाणून घ्या आजचे दर 'एबीपी नेटवर्क'च्या 'आयडियाज ऑफ इंडिया' (Ideas of India) परिषदेत 'न्यू इंडिया, न्यू मेनिफेस्टो - सबका साथ, सबका विकास' या सत्रात गडकरी बोलत होते. ही परिषद मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, 'भारतात 80 टक्के कच्चं तेल आयात केलं जातं. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या (Crude Oil) किमती वाढल्या आहेत. आम्ही त्यामध्ये काहीही करू शकत नाही.' इंधनाच्या बाबतीत स्वावलंबी होण्याची गरज '2014पासून भारताला स्वावलंबी (Self-reliant) बनविण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेद्वारे आपण स्वतःचं इंधन तयार केलं पाहिजे. स्वदेशी ऊर्जानिर्मिती क्षमता विकसित करण्याच्या गरजेवर जास्त भर दिला पाहिजे,' असं गडकरी म्हणाले. आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.20 रुपयांची वाढ या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर एकूण 3.20 रुपयांनी वाढ झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे कंपन्यांनी 137 दिवस तेलाच्या किमती 'जैसे थे' ठेवल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) क्रूड ऑइलचे दर सुमारे 45 टक्क्यांनी वाढूनही भारतात दरवाढ झाली नव्हती. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर हळूहळू दरवाढ सुरू झाली आहे. शुक्रवारी (25 मार्च 2022) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली. गेल्या चार दिवसांतली ही तिसरी वाढ आहे. आज (26 मार्च) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज राजधानी दिल्लीत पेट्रोल 98.61 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 89.87 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे 'या' दोन स्टॉक्समधील तेजी कायम राहणार, तज्ज्ञांचं म्हणणं काय? वाचा सविस्तर चारही महानगरांमधले पेट्रोल आणि डिझेलचे दर (26 मार्च 2022) 1) दिल्ली - पेट्रोल 98.61 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रतिलिटर 2) मुंबई - पेट्रोल 113.35 रुपये आणि डिझेल 97.55 रुपये प्रतिलिटर 3) चेन्नई - पेट्रोल 104.43 रुपये आणि डिझेल 94.47 रुपये प्रतिलिटर 4) कोलकाता - पेट्रोल 108.01 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रतिलिटर सध्या मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वांत जास्त आहेत. ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास सामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा ताण पडण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Nitin gadkari, Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Russia Ukraine

पुढील बातम्या