जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ठरलं! नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

ठरलं! नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

ठरलं! नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

हिरे व्यापारी नीरव मोदीबाबत ब्रिटन हायकोर्टाने याचिका फेटाळली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: कोट्यवधी रुपयांची अफरातफर करणाऱ्या नीरव मोदीला मोठा दणका मिळाला आहे. नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच नीरव मोदीचं भारतात प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हिरे व्यापारी नीरव मोदीबाबत ब्रिटन हायकोर्टाने याचिका फेटाळली आहे. डिसेंबर 2019 मध्ये विशेष पीएमएलए न्यायालयाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 नुसार फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर तो लंडनला पळून गेला. तीन वर्षांपूर्वी नीरव मोदीला ब्रिटनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी 13 मार्च 2019 रोजी लंडनमधून अटक केली होती. त्यानंतर त्याला दक्षिण पश्चिम लंडनमधील वाँड्सवर्थ तुरुंगात कैद करण्यात आले आहे. मात्र ब्रिटनमधून भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. नीरव मोदीला आता लवकरच भारतात आणलं जाणार आहे.

फरारी गुन्हेगारांना परदेशातून कसे आणले जाते, प्रत्यार्पण म्हणजे काय? ते कसे होते?

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना नीरव मोदीने फसवलं होतं. त्यानंतर तो लंडनला पळून गेला. भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.

News18लोकमत
News18लोकमत

भारतातल्या बँकांचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून नीरव मोदी फरार झाला होता. त्याच्यावर EDने देखील अनेक आर्थिक गुन्हे दाखल केले आहेत. आर्थिक गुन्ह्याचा आरोप असल्याने त्याची 329.66 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. यात त्याची मुंबईची मालमत्ता, आलिशान फ्लॅट याचाही समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात