जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कूरियर आणि नोकरीचा असा मॅसेज आला तर व्हा सावधान! तुमचं बँक अकाउंटही होईल रिकामं

कूरियर आणि नोकरीचा असा मॅसेज आला तर व्हा सावधान! तुमचं बँक अकाउंटही होईल रिकामं

फ्रॉड अलर्ट

फ्रॉड अलर्ट

सध्याच्या काळात ऑनलाईन फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याविषयीच आज सविस्तर आपण जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Fraud Alert: ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकार, बँका आणि मीडिया मोठ्या प्रमाणावर जनजागृती करतात. मात्र तरी देखील ऑनलाइन ठग हे यूझर्सची फसवणूक करण्याचा कोणता ना कोणता मार्ग शोधूनच काढतात. आजकाल फसवणूक करणारे लोकांना कसे लोकांना फसवत आहेत याविषयी आपण जाणून घेऊया. तसंच यापासून कसं दूर राहायचं हे देखील जाणून घेऊया.

News18लोकमत
News18लोकमत

फ्रॉड करण्याची पहिली पद्धत

अनेकांना कुरिअर सेवा कंपनीकडून ई-मेल येतो, ज्यामध्ये तुमच्या नावावर पार्सल आल्याचे सांगितले जाते. 24 तासांच्या आत पार्सल मिळण्याची प्रक्रिया करा, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल. या मेलमध्ये तुम्हाला एक डॉक्यूमेंट पाठवण्यासही सांगितले जाते. दुसरे, तुम्हाला एक ऑटोमेटेड कॉल येईल ज्यामध्ये तुम्हाला गुन्ह्याच्या अधिकाऱ्याशी बोलण्यासाठी इनपुट टाकण्यास सांगितले जाईल. तो कथित अधिकारी तुमचा ओळखपत्र आणि इतर डिटेल्स तुमच्याकडून घेईल. तुम्ही ही प्रक्रिया न केल्यास तुम्हाला अटक केली जाऊ शकते असंही तुम्हाला सांगण्यता येईल. नोटरी की रजिस्टर्ड रेंट अ‍ॅग्रीमेंट? कोणतं आहे बेस्ट? भाड्याने राहण्यापूर्वी अवश्य घ्या जाणून

कसे टाळावे?

वर लिहिलेल्या दोनपैकी कोणत्याही प्रकारे मेल किंवा कॉल आल्यास सावध व्हा. मेलमध्ये आलेले कोणतेही डॉक्यूमेंट तुम्ही न उघडलेलंच बरं. कारण त्यात मालवेअर असू शकतो, ज्यामुळे तुमचे डिव्हाइस खराब होऊ शकते. अशा वेळी, सर्वप्रथम मेल पाठवणाऱ्याचा आयडी व्हेरिफाय करा. यासाठी तुम्ही शब्दांचे स्पेलिंग काळजीपूर्वक पहा. तसेच, जर तुम्हाला कॉल आला तर कॉलरला सांगा की तुम्ही थेट कुरिअर सेवा कंपनीकडे चौकशी करा. प्रत्येक कुरिअर सेवा कंपनीकडे टोल-फ्री नंबर आणि वेबसाइट आहेत जिथे तुम्ही तुमचा ट्रॅकिंग नंबर टाकून तुमची ऑर्डर ट्रेस करू शकता.

फ्रॉड करण्याची दुसरी पद्धत

यामध्ये एक कॉलर तुम्हाला पॅकेज डिलिव्हर करण्याविषयी बोलेल. ज्याची तुम्ही ऑर्डरही केलेली नाही. डिलिव्हरी पार्टनर म्हणेल की तुम्ही ऑर्डर रद्द न केल्यास तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्यातून पैसे कापले जातील. मग ते तुमची वैयक्तिक माहिती जसे की तुमच्या कार्डची एक्सपायरी डेट किंवा तुमच्या आईचे नाव विचारू शकतात. त्यानंतर ते तुमच्या फोनवर OTP मागू शकतात.

एसीसोबत सीलिंग फॅन लावला पाहिजे का? यामुळे थंड हवा बाहेर जाते का?

कसा करावा बचाव

कोणताही OTP किंवा पर्सनल डिटेल्स कधीही कोणाशीही शेअर करू नका. डिलिव्हरी पार्टनरला विचारा की तुम्हाला कोणत्या कंपनीने किंवा ई-कॉमर्स साइटने पॅकेज पाठवले आहे. त्यानंतर त्या साइटवर तुमचे अकाउंट आणि ऑर्डर तपासा. अशी कोणतीही ऑर्डर त्यावर नसेल तर ती फसवणूक आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलणे टाळा. लक्षात ठेवा, तुमच्या मंजुरीशिवाय कोणतीही वेबसाइट, बँक किंवा डिजिटल वॉलेट तुमच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही.

फ्रॉड करण्याची तिसरी पद्धत

यामध्ये, फसवणूक करणारा कॉलर बँकेचा प्रतिनिधी बनून तुमच्याशी बोलू शकतो. जो तुम्हाला तुमच्या जमिनीवर एटीएम बसवण्याची ऑफर देईल. कॉलर तुम्हाला सांगेल की तुम्ही प्रत्येक एटीएम व्यवहारावर 5-15 रुपये कमवू शकता. ते तुम्हाला आधार आणि पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे जमा करण्यास सांगतील. यासाठी ते तुम्हाला काही कागदपत्रेही दाखवतील, ज्यामध्ये ते तुमच्याकडून सिक्युरिटी मनीच्या नावावर 5 लाख रुपयांपर्यंतची मागणी करू शकतात.

कसा करावा बचाव

कोणतीही बँक आपले एटीएम डायरेक्ट लावत नाही. यासाठी त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टर आहेत. एखाद्या ठिकाणी अशा फ्रँचायझीसाठी अर्ज पाठवल्यावरच एटीएम बसवले जातात. तुमच्याकडे 50-100 चौरस फूट जागा आहे, जी दुसऱ्या एटीएमपासून किमान 100 मीटर अंतरावर आहे आणि 1 किलोवॅट वीज पुरवठा आहे याची तपासणी केल्यानंतरच बँक एटीएम बसवण्याची परवानगी देईल.

फक्त 700 रुपयांना मिळतोय Samsung चा 14 हजारांचा 5G फोन! पाहा कुठे आहे ही ऑफर

फ्रॉड करण्याची चौथी पद्धत

बर्‍याच लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अॅप्सवर बर्‍याचदा जॉब मेसेज मिळतात, ज्यासाठी तुम्हाला फक्त पोस्ट, रील आणि व्हिडिओ लाईक किंवा शेअर करावे लागतात. सुरुवातीला तुम्हाला चांगली रक्कम मिळेल, जी दररोज 500-5,000 रुपये असेल. तुमचा विश्वास जिंकल्यानंतर, फसवणूक करणारा तुम्हाला जास्त पैसे देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी काही पैसे देण्यास सांगेल किंवा क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म किंवा डिजिटल मार्केटिंग स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास सांगेल.

कसा करावा बचाव

सुरुवातीला हे खूप सोपं वाटतं, परंतु या योजनेमुळे तुम्ही फसू नका. तुमचे पैसे कधीही अशा कोणत्याही व्यवसायात गुंतवू नका ज्याचे क्रेडिट तुम्हाला माहीत नाही. 28 मार्च ते 22 एप्रिल दरम्यान असाच व्यवहार करून नुकतेच पुण्यातील एका आय स्पेशलिस्ट महिला डॉक्टरची सुमारे 24 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

फ्रॉड करण्याची पाचवी पद्धत

अनेक वेळा तुम्हाला एक मेल, एसएमएस किंवा बाजारात एखादे रँडम व्हाउचर मिळू शकतात, जे तुम्हाला मोफत भेटवस्तू किंवा काही पैसे देण्याचे वचन देतात. हे गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला QR कोड स्कॅन करणे आवश्यक आहे. मात्र असा कोणताही कोड स्कॅन केल्यास तुम्हाला चुकीच्या वेबसाइटवर नेले जाईल. जेथून स्कॅमर तुमच्या फोनचा डेटा चोरू शकतो.

कसा करावा बचाव

जोपर्यंत तुम्हाला सोर्स निश्चितपणे माहित नाही तोपर्यंत काहीही स्कॅन करू नका. स्कॅनर फिजिकलरित्या तुमच्या समोर असल्यास, छेडछाड चेक करा आणि कोड दुसऱ्याच्या वर पेस्ट केला आहे का ते पहा. तुमचा फोन तुम्हाला कोणता QR कोड पाठवण्याचा प्रयत्न करत आहे हे सांगेल, त्यामुळे लिंक उघडण्यापूर्वी URL सुरक्षित आहे याचे व्हेरिफिकेशन करा. QR कोड स्कॅनिंग अॅप कधीही डाउनलोड करू नका आणि फक्त तुमच्या फोनचा कॅमेरा वापरा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात