नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : सोशल मीडिया कंपन्यांवर ताशेरे ओढण्यासाठी आयटी इंटरमीडियरीज रूल 2022ला अधिसूचित केले आहे. तसेच आता 3 सरकारी अधिकार्यांसाठी तक्रार अपीलीय प्राधिकरणाची (ग्रीवांस अपीलेट अथॉरिटी) स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे सोशल मीडिया कंपन्यांच्या तक्रार अधिकाऱ्याने मजकूर काढून टाकण्यास नकार दिल्यानंतर कोणतीही व्यक्ती तक्रार अपील समितीसमोर अपील करू शकणार आहे. यानंतर सोशल मीडिया कंपनीला समितीच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे. याशिवाय भारताची एकता, अखंडता, संरक्षण, सुरक्षा, सार्वभौमत्व यांना हानी पोहोचवणारी कोणतीही डाटा असू नये. परराष्ट्र धोरण किंवा संबंधांवर परिणाम करणार्या पोस्ट, व्हायरस/स्पॅम पसरवणारी सामग्री, आर्थिक फायद्यासाठी तयार केलेला खोटा प्रचार आणि ज्यात फसवणूक, कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, अशा कोणत्याही माहितीचा प्रचार केला जाणार नाही. IT मंत्रालयाने नियम अधिसूचित केला - नवीन नियमांनुसार 90 दिवसांच्या आत तक्रार अपील समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असेल. सोशल मीडिया कंपन्यांनी हे देखील सुनिश्चित केले पाहिजे की, त्यांची संगणक संसाधने वापरणारी व्यक्ती दुसर्या व्यक्तीच्या मालकीची आणि ज्यावर वापरकर्त्याला अधिकार नाहीत, अशी कोणतीही सामग्री होस्ट, प्रदर्शित किंवा अपलोड, प्रकाशित किंवा सामायिक करणार नाही. तसेच अश्लील, अपमानास्पद, बाल लैंगिक अत्याचार, इतरांच्या गोपनीयतेशी संबंधित, जात, जात, जन्म किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या आधारावर छळ करणाऱ्या किंवा देशाच्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सामग्रीचा प्रचार करू नये. हेही वाचा - केंद्रीय कायदे मंत्र्यांनी सांगितल्या, काश्मिरच्या बाबतीत नेहरू सरकारने केलेल्या त्या 5 चुका वापरकर्त्यांना पहिल्यांदाच अधिकार - नव्या नियमांनुसार कोणतीही व्यक्ती समितीकडे दाद मागू शकते. तक्रार अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील करता येते. ही समिती 30 दिवसांत निर्णय देईल. सोशल मीडिया कंपन्यांना समितीच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे. यामुळे काय होणार? तज्ज्ञांच्या मते, यामुळे सोशल मीडिया कंपन्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. सोशल मीडिया कंपन्यांना सूचना मिळाल्यानंतर 24 तासांच्या आत डाटा काढून टाकावा लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.