गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये विविध कंपन्या मार्केटमध्ये आयपीओ घेऊन (Investment in IPO) येत आहेत किंवा काही कंपन्यांची यासंदर्भातील तयारी पूर्ण झाली आहे. आता आणखी एक कंपनी मार्केटमध्ये आयपीओ आणण्याची तयारी करत आहे
देशातील प्रमुख इथेनॉल उत्पादक कंपनी गोदावरी बायोरिफानेरीज (Godavari Biorefineries) ने आयपीओसाठी (IPO) लागणारे प्राथमिक दस्तावेज मार्केट रेग्यूलेटर सिक्योरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडे जमा केले आहेत.
या आयपीओअंतर्गत 370 कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करण्यात येणार आहेत. याशिवाय प्रमोटर्स आणि डायरेक्टर 65,58,278 इक्विटी शेअर्सचे ओएफएस म्हणजेच ऑफर फॉर सेल जारी करतील.
गोदावरी बायोरिफानेरीज 100 कोटींच्या आयपीओ पूर्वनियोजनाचा देखील विचार करत आहे. असे झाल्यास नवीन इश्यूचा आकार घटू शकतो.
कंपनी कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि उसाच्या गाळप विस्ताराच्या भांडवली खर्चासाठी नवीन इश्यूतून मिळालेली रक्कम वापरेल. या व्यतिरिक्त, कंपनी ही रक्कम पोटॅश युनिटला भांडवली समर्थन देण्यासाठी वापरेल .
देशात इथेनॉलवर आधारित रसायनांच्या निर्मितीमध्ये कंपनी आघाडीवर आहे. इक्वायरस कॅपिटल आणि जेएम फायनान्शियलला यासाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे.