Home /News /news /

Adani Wilmar IPO 27 जानेवारीला येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी; वाचा महत्त्वाच्या गोष्टी

Adani Wilmar IPO 27 जानेवारीला येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी; वाचा महत्त्वाच्या गोष्टी

अदानी विल्मरच्या (Adani Wilmar IPO) शेअर्सची लिस्टिंग 8 फेब्रुवारी 2022 रोजी होण्याची शक्यता आहे. कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE या दोन्ही ठिकाणी लिस्ट केले जातील. शेअर्सचे अलॉटमेंट 3 फेब्रुवारीला होऊ शकते.

    मुंबई, 22 जानेवारी : खाद्यतेल (Edible Oil) बनवणारी दिग्गज कंपनी अदानी विल्मरचा IPO 27 जानेवारीला (Adani Wilmar IPO) सुरू होत आहे. अदानी विल्मर IPO ची किंमत 218-230 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 31 जानेवारी 2022 पर्यंत गुंतवणूकदार IPO मध्ये अर्ज करू शकतील. 25 जानेवारीला हा इश्यू अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. अदानी विल्मरने IPO साठी 65 शेअर्स लॉटमध्ये ठेवले आहेत. गुंतवणूकदार किमान 65 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतात. किरकोळ गुंतवणूकदार (retail investors) किमान 14,950 रुपये प्रति लॉटची गुंतवणूक करू शकतात आणि त्यांची कमाल गुंतवणूक 13 लॉटसाठी 1,94,350 असेल. ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम अदानी विल्मरच्या शेअर्सची लिस्टिंग 8 फेब्रुवारी 2022 रोजी होण्याची शक्यता आहे. कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE या दोन्ही ठिकाणी लिस्ट केले जातील. शेअर्सचे अलॉटमेंट 3 फेब्रुवारीला होऊ शकते. ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळणार नाहीत त्यांना 4 फेब्रुवारी रोजी त्यांचे पैसे परत मिळतील. अदानी विल्मर आयपीओ सध्या ग्रे मार्केट (GMP) मध्ये 65 रुपयांच्या प्रीमियमवर आहे. म्हणजे ग्रे मार्केटला या इश्यूवर नफ्याची अपेक्षा आहे. दीड लाखांपर्यंत अतिरिक्त टॅक्स सूट मिळू शकते, करावं लागेल 'हे' काम अदानी विल्मर कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, अदानी विल्मारच्या आयपीओची इंटिमेशन 2 ऑगस्ट 2021 रोजी देण्यात आली होती. त्यानंतर अदानी एंटरप्रायझेसने 19 जानेवारी 2022 रोजी SEBI कडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सादर केला आणि 20 जानेवारी रोजी त्याला मान्यता मिळाली. अदानी समूहाची कंपनी (Adani Group) अदानी विल्मर ही एफएमसीजी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. ही कंपनी फॉर्च्युन (Fortune) या ब्रँडच्या नावाने खाद्यतेल, मैदा आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांचा व्यवसाय करते. अदानी विल्मर हा सिंगापूरचा विल्मर समूह आणि भारताचा अदानी समूह यांच्यातील 50-50 टक्के भागीदारी असलेला संयुक्त उपक्रम आहे. अदानी समूहाच्या 6 कंपन्या लिस्ट आहेत. अदानी विल्मर ही लिस्ट होणारी सातवी कंपनी आहे. शेअर बाजारात घसरणीदरम्यान 'या' IT स्टॉकमध्ये तेजी, काय आहे कारण? तज्ज्ञांचं मत काय? IPO साईज कमी केला अदानी विल्मरने सुरुवातीला 4500 कोटी रुपयांचा IPO आणण्याची योजना आखली होती परंतु नंतर ती कमी करून 3600 कोटी रुपये केली. कंपनीने सांगितले की IPO मध्ये पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. IPO मधून जमा होणारा निधी कंपनीच्या व्यवसायासाठी वापरला जाईल, असे अदानी विल्मरचे म्हणणे आहे. IPO मधून मिळालेल्या रकमेपैकी 1,900 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी वापरले जातील. 1100 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि 500 ​​कोटी रुपये अधिग्रहण आणि गुंतवणुकीसाठी वापरले जातील. सर्वात मोठे डिस्ट्रिब्युशन नेटवर्क अदानी विल्मरच्या वेबसाइटनुसार, कंपनीकडे खाद्यतेलाच्या बाजारपेठेत सर्वात मोठे डिस्ट्रिब्युशन नेटवर्क आहे. त्याचे देशभरात 85 स्टॉक पॉइंट आणि 5000 डिस्ट्रिब्युटर्स आहेत. किरकोळ बाजारात अदानी विल्मरचा हिस्सा 10 टक्के आहे. त्याचे उत्पादन देशभरातील सुमारे 15 लाख रिटेल आउटलेटवर उपलब्ध आहे. कंपनीने स्पेशल तेल Rice Bran and Vivo देखील लाँच केले. कंपनीचा आणखी एक तेल ब्रँड Rupchanda बांगलादेशातील बाजारपेठेत आघाडीवर आहे. कंपनीचे तेथे दोन मोठे रिफायनरीही आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या