जाहिरात
मराठी बातम्या / मनी / म्यूच्युअल फंडवर लोन घेता येतं का? किती असतं व्याज? सर्व प्रश्नांची उत्तरं घ्या जाणून

म्यूच्युअल फंडवर लोन घेता येतं का? किती असतं व्याज? सर्व प्रश्नांची उत्तरं घ्या जाणून

म्यूच्युअल फंडवर लोन कसं घ्यायचं?

म्यूच्युअल फंडवर लोन कसं घ्यायचं?

म्यूच्युअल फंडातून शॉर्ट टर्ममध्ये पैसे काढण्याऐवजी तुम्हाला गरजेच्या वेळी त्यावर कर्ज घेता येईल. हे कर्ज तुमच्यासाठी खूप स्वस्तात असतं. ते कसं घ्यायचं आणि त्याची प्रोसेस काय हे आपण जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 मे: म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमान सध्या वाढले. दीर्घकालीन रिटर्नसाठी म्यूच्युअल फंड उत्तम मानले जाते. बहुतेक गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करताना मध्यम ते दीर्घ मुदतीचे लक्ष्य ठेवतात. याद्वारे, ते थोड्या-थोड्या कालावधीतही एक चांगला फंड तयार करू शकतात. मात्र अनेक गुंतवणूकदार कमी कालावधीच म्यूच्युअल फंड युनिट्स विकतात आणि त्यांचे पैसे काढून घेतात. खरंतरं अशा वेळी त्यांना जास्त फायदाही झालेला नसतो. अशा वेळी म्यूच्युअल फंडातून पैसे काढण्याऐवजी तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता.

News18लोकमत
News18लोकमत

तुम्ही म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल तर गरज पडल्यावर तुम्हाला त्यावर कर्ज देखील घेता येतं. अनेकदा म्यूच्युअल फंडांचे रिटर्न इतर फिक्सड रिटर्नच्या ऑप्शन्सच्या तुलनेत जास्त असतात. त्यामुळे त्यात गुंतवणूक कायम ठेवणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. चला तर मग जाणून घेऊया म्यूच्युअल फंडवर कर्ज कसं घ्यायचं?

म्यूच्युअल फंडांवर कर्ज कोण घेऊ शकतं?

म्यूच्युअल फंडवर लोन घेण्यासाठी इंडिव्हिज्युअल इन्वेस्टर्स एनआरआय, रजिस्टर्ड बिझनेस, हिंदू युनायटेड फॅमिली, ट्रस्ट, कॉर्पोरेशन आणि इतर संस्था म्यूच्युअल फंडाच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात. अल्पवयीन मुले म्यूच्युअल फंड एसेट्सवर कर्ज घेऊ शकत नाहीत. कर्ज देण्यापूर्वी बँक किंवा संबंधित वित्तीय संस्था तुमच्या क्रेडिट स्कोअरसह अनेक निकषांवर आधारित कर्जाची रक्कम, त्याचा कालावधी आणि कर्जावर आकारले जाणारे व्याजदर ठरवत असते. तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळवण्यात मदत मिळते.

FD करण्याचे आहेत 9 नुकसान, गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा वाचाच!

कर्जाची रक्कम किती असेल?

इक्विटी म्यूच्युअल फंडाच्या बाबतीत, तुम्हाला नेट असेट व्हॅल्यूच्या 50% पर्यंत कर्ज मिळू शकते. तर, फिक्स्ड इन्कमच्या म्यूच्युअल फंडवर नेट एसेट व्हॅल्यूच्या 70-80 टक्क्यांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. म्यूच्युअल फंडावर लोन घेण्यासाठी तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थेशी संपर्क साधावा लागेल. अनेक ठिकाणी यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही मिळते. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे आणि यामुळे तुम्हाला लवकर कर्ज मिळते.

Credit Card Tips: क्रेडिट कार्डचा पूर्ण लाभ घ्यायचायं? कार्डची लिमिट वाढवणं योग्य की अपग्रेड करणं?

प्रोसेसिंग फिसमध्ये मिळते सूट

म्यूच्युअल फंडवर कर्ज घेणं सोपं असतं. कारण यामध्ये तुम्हाला पर्सनल लोनच्या तुलनेत कमी व्याजावर कर्ज मिळतं. एवढंच नाही तर प्रोसेसिंग फीवरही सूट मिळते. तुम्ही कर्जाच्या रकमेचा काही भाग परत करता तेव्हा म्यूच्युअल फंड युनिट्स देखील तुम्हाला त्याच प्रमाणात परत केली जातात. जे यूनिट्स तुम्ही लोनसाठी जमा करतात, ते तुम्ही रिडीम करु शकत नाही. यासोबतच तुमच्या म्यूच्युअल फंडच्या गुंतवणुकीवर डिव्हिडेंड आणि वाढ जारी राहते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात