मुंबई, 6 जून : ऑनलाइन फसवणुकीच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी भागात एका महिलेच्या खात्यातून ठगांनी 6 लाखांहून अधिक रुपये लंपास केले आहेत. इंटरनेटवर सापडलेल्या ‘कस्टमर केअर नंबर’वर महिलेने संपर्क केला होता. यानंतर हा प्रकार घडला. ती महिला तिच्या UPI ई-वॉलेटमध्ये 200 रुपयांची थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला याविषयी जास्त माहिती नव्हती. यासाठी तिने इंटरनेटवर कस्टमर केयरचा नंबर शोधला आणि तिला हे चांगलच महागात पडलं.
या प्रकरणाविषयी पोलिसांनी सांगितलं की, 32 वर्षीय तक्रारदार एका ट्रॅव्हल एजन्सीत पार्ट टाइम काम करते. तिला एका क्लाइंटकडून आपल्या ई-वॉलेटमध्ये 200 रुपये घ्यायचे होते. मात्र, हा व्यवहार मध्येच अडकला. ट्रांझेक्शन अर्धवट राहिल्याने महिलेला 200 रुपये मिळाले नाहीत. पेटीएमचा कस्टमर केअर नंबर शोधण्यासाठी त्याने गुगलची मदत घेतली. यानंतर महिलेला ‘हेल्पलाइन’ मिळाली. महिलेने यावर कॉल केला आणि तिचे तब्बल 6.42 लाख रुपये लंपास झाले.
Fraud Alert: केवायसीच्या नावाखाली महिलेला 1 लाखांचा गंडा! कसा करायचा स्वतःचा बचाव?फसवणूक कशी झाली? पोलिसांनी सांगितले की, सायबर ठगने आपला नंबर हा कस्टमर केयर म्हणून इंटरनेटवर अपलोड केलेला होता. महिलेने त्या नंबरवर संपर्क साधला. यावेळी तिथून एका व्यक्तीने उत्तर दिले. त्याने स्वतःची ओळख पेटीएमचे कार्यकारी म्हणून केली. महिलेने तिची समस्या त्या ठगाला सांगितली. ही व्यक्ती कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून महिलेशी बोलत होती. त्यानंतर ठगने तिला रिमोट लोकेशन अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जेणेकरून तो तिच्या फोनमध्ये एंट्री करू शकेल. महिलेनेही तसेच केले.
HDFC बँकेने लॉन्च केले दोन नवे FD प्लान, गुंतवणुकीवर मिळेल जोरदार व्याजपैसे पाठवण्यास सांगितलं महिलेच्या परवानगी घेऊन या व्यक्तीने अॅपद्वारे फोनमध्ये एंट्री केली. यानंतर, बोलत असताना त्याने महिलेला काही पैसे पाठवण्यास सांगितले. त्याने असं केलं कारण तो महिलेच्या बँकिंग अॅपमध्ये एंट्री करून फंड ट्रान्सफर करु शकेल. त्याने सांगितले की तुम्ही काही पैसे पाठवा जे रिफंडेबल आहेत म्हणजेच तुमच्या खात्यात परत केले जातील. महिलेनेही तसेच केले. यानंतर जे झालं ते पाहून महिलेल्या पायाखालची जमीन सरकली. या गुंडाने महिलेच्या खात्यातून एकूण 6.42 लाख रुपये ट्रान्सफर केले. यानंतर महिला ठगाला फोन करु लागली पण त्याचा फोन बंद आला.