Home /News /money /

Petrol Diesel Prices: मुंबईत पेट्रोल 120 रुपये पार, तपासा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

Petrol Diesel Prices: मुंबईत पेट्रोल 120 रुपये पार, तपासा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट

Petrol Diesel rate: सरकारी तेल कंपन्यांनी 22 मार्चनंतर आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ केली आहे.

    नवी दिल्ली, 9 एप्रिल : मागील जवळपास चार महिन्यांपासून स्थिर असलेले पेट्रोल-डिझेलचे भाव आता दररोज वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 22 मार्चनंतर आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ केली आहे. परंतु मागील सलग तीन दिवसांपासून इंधन दर वाढलेला (Petrol Diesel Price Hike)  नाही. आज शनिवारीही तेल कंपन्यांनी किमतीत कोणतेही बदल केलेले नाहीत. तेल कंपन्यांनी शनिवारी राजधानी दिल्लीसह देशातील चार महानगरांत आणि प्रमुख शहरातही पेट्रोल-डिझेल दर स्थिर ठेवला आहे. दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आहे. यापूर्वी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर गेल्यानंतर तेल कंपन्यांनी आपला तोटा भरुन काढण्यासाठी किमती वाढवल्या होत्या. 16 दिवसांत 14 वेळा किमती वाढवल्या आहेत. चार महानगरात पेट्रोल-डिझेलचे दर - – दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर – चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. दरम्यान, पेट्रोल-डिझेलला स्वस्त Petrol Diesel Prices: मुंबईत पेट्रोल 120 रुपये पार, तपासा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेटपर्याय म्हणून असलेल्या सीएनजीमध्येही मोठी वाढ झाली आहे. मुंबईत CNG तब्बल 7 रुपयांनी महाग (CNG Price Hike Mumbai) झालं आहे. मुंबईतील सीएनजीचा भाव 67 रुपये किलो इतका आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीमध्येही वाढ झाल्याने वाहनधारकांना महागाईचा, इंधन दरवाढीचा मोठा तिहेरी झटका बसला आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike, Petrol price

    पुढील बातम्या