नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : 2016 मध्ये केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीनंतर आता मोदी सरकारने सराफा व्यावसायिकांना सरप्राइज टॅक्स नोटीस पाठवली आहे. नोटबंदीनंतर सराफा व्यावसायिकांनी जे दागिने विकले त्याची माहिती त्यांना द्यावी लागणार आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने आपल्या एका अहवालात याबद्दल पूर्ण माहिती दिली आहे. 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर या पैशातून अनेकांनी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली होती. त्यादिवशी विक्री वाढली मुंबईच्या एका सराफा व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, नोटबंदीच्या घोषणेच्या दिवशीच त्यांना त्यांच्याकडच्या दागिन्यांची विक्री केली होती. आता त्या दागिन्यांच्या विक्रीबद्दल त्यांना टॅक्स नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्याकडून त्या काळात झालेल्या विक्रीची माहिती मागवण्यात आली आहे. काय सांगतो कायदा? सरकारला असा संशय आहे की दागिन्यांच्या खरेदीसाठी काळा पैसा वापरला गेला. त्यामुळेच या सराफांनी त्यावेळी केलेल्या कमाईच्या 20 टक्के रक्कम जमा करावी, असा नियम करण्यात आलाय. याविरोधात सराफा व्यावसायिकांनी कोर्टात दाद मागितली आहे पण ते जर या खटल्यात हरले तर त्यांनी ही पूर्ण रक्कम भरावी लागेल. 500 अब्ज रुपये सराफा व्यावसायिकांनी ही रक्कम चुकती केली तर 500 अब्ज कोटी रुपया जमा होऊ शकतात, अशी अपेक्षा आहे. असं असलं तरी सराफा व्यावसायिकांच्या उत्पन्नातली मोठी रक्कम कराच्या स्वरूपात घेण्यावर आक्षेप असू शकतो. टॅक्स भरण्याची नोटीस रॉयटर्स या वृत्तसंस्थेने 2 अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लिहिलं आहे, या वर्षी करविभागाने हजारो लोकांना टॅक्सबद्दल नोटीस पाठवली आहे. पण यावर CBDT आणि अर्थमंत्रालयाने कोणतीही टिप्पणी केलेली नाही.या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट आणि इनकम टॅक्सवसुलीचं लक्ष्य कमी असू शकतं. त्यामुळेच सरकार वेगवेगळ्या मार्गांनी करवसुली करेल, अशी शक्यता आहे. ====================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.