जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Multibagger Stock: शेअर बाजाराच्या घसरणीतही 'हा' शेअर 150 टक्के वधारला, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock: शेअर बाजाराच्या घसरणीतही 'हा' शेअर 150 टक्के वधारला, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock: शेअर बाजाराच्या घसरणीतही 'हा' शेअर 150 टक्के वधारला, तुमच्याकडे आहे का?

Tine Agro च्या शेअरची किंमत पाहता, गेल्या 1 आठवड्यात, या मल्टीबॅगर स्टॉकने पाचही ट्रेडिंग सत्रांमध्ये अप्पर सर्किटला धडक दिली आहे. शेअरने 5 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या भागधारकांना 21.5 टक्के परतावा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 मार्च : शेअर बाजारात (Share Market Down) मोठी घसरण होऊनही, काही शेअर्स असे आहेत ज्यांनी मल्टीबॅगर परतावा दिला आहे. Tine Agro चा स्टॉक हा असाच एक स्टॉक आहे. हा टेक्सटाईल क्षेत्रातील (Textile Sector) स्टॉक आहे आणि 2022 चा मल्टीबॅगर पेनी स्टॉक (What is penny Stock?) देखील आहे. 2022 मध्ये आतापर्यंत हा मल्टीबॅगर स्टॉक 7.14 रुपयांवरून 56.05 रुपयांपर्यंत वाढला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकमध्ये 685 टक्के वाढ झाली आहे. शेअर बाजारातील घसरणीदरम्यान शेअरधारकांना या शेअरने श्रीमंत केले आहे. Tine Agro ने आजच्या ट्रेडिंग सेशनमध्येही 5 टक्क्यांची अप्पर सर्किट लगावली आहे आणि बीएसईवर 56.05 रुपयांच्या ऑलटाईम हायवर पोहोचताना दिसत आहे. Tine Agro च्या शेअरची किंमत पाहता, गेल्या 1 आठवड्यात, या मल्टीबॅगर स्टॉकने पाचही ट्रेडिंग सत्रांमध्ये अप्पर सर्किटला धडक दिली आहे. शेअरने 5 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या भागधारकांना 21.5 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 1 महिन्यात, हा मल्टीबॅगर स्टॉक 22.65 रुपयांवरून 56.05 रुपयांपर्यंत वाढला आहे. या स्टॉकने 1 महिन्यात 150 टक्के परतावा दिला आहे. Share Market Crashed: शेअर बाजारातील घसरण थांबेना! Sensex 1400 अंकांनी खाली, तर Nifty 15900 वर 2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने 685 टक्के परतावा दिला आहे. याच कालावधीत सेन्सेक्स सुमारे 9 टक्के आणि निफ्टी सुमारे 10 टक्क्यांनी घसरला आहे. अशा परिस्थितीत, या X Group च्या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने 2022 मध्ये अल्फा परतावा दिला आहे. Share Market : शेअर बाजारात फेब्रुवारीपासून 29 लाख कोटींचं नुकसान, गुंतवणूकदार चिंतेत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 56.05 च्या आतापर्यंतच्या उच्चांकावर ट्रेड करत आहे. तर बीएसईवर त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक 3.90 रुपयांवर आहे. BSE वर लिस्ट असलेल्या या स्टॉकचे सध्याचे ट्रेडिंग व्हॉल्यूम 6,53,631 आहे जे त्याच्या 20 दिवसांच्या सरासरी 51,324 पेक्षा खूप जास्त आहे. या मल्टीबॅगर टेक्सटाईल स्टॉकची सध्याची मार्केट कॅप 31 कोटी रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात