जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Multibagger Stock: एक लाख बनले 82 लाख, 'या' स्टॉक्समुळे गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock: एक लाख बनले 82 लाख, 'या' स्टॉक्समुळे गुंतवणूकदार मालामाल

Multibagger Stock: एक लाख बनले 82 लाख, 'या' स्टॉक्समुळे गुंतवणूकदार मालामाल

सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेडच्या (Sindhu Trade Links Ltd) शेअरची किंमत सध्या 139.25 रुपये आहे. फक्त 5 दिवसांपूर्वी हा शेअर 121 रुपयांवर होता. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्याने उसळी सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 फेब्रुवारी : शेअर बाजारात ‘खरेदी, विक्री आणि विसरा’ हे धोरण वापरुन पैसे बनवता येतात. मार्केटचे योग्य ज्ञान, अतिरिक्त पैसा आणि मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी संयम असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक पेनी स्टॉक्स आहेत जे ठराविक कालावधीत उत्तम परतावा देत आहेत. असाच एक स्टॉक म्हणजे सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेड स्टॉक (Sindhu Trade Links Ltd) आहे. सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेडच्या शेअरची किंमत सध्या 139.25 रुपये आहे. फक्त 5 दिवसांपूर्वी हा शेअर 121 रुपयांवर होता. गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्याने उसळी सुरू आहे. 6 महिन्यांत जबरदस्त परतावा सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेड स्टॉक (Sindhu Trade Links Ltd stock price) 6 महिन्यांपूर्वी 12 ऑगस्ट 2021 रोजी फक्त 9.70 वर ट्रेड करत होता. ऑगस्ट महिन्यापासून हा स्टॉक पुढे सरकला आणि सतत वाढत गेला. सप्टेंबरमध्ये शेअरमध्ये चांगली वाढ झाली. शेअरने दोन दिवसांपूर्वी 140 रुपयांची पातळी गाठली. या शेअरने या अल्प कालावधीत सुमारे 1350 टक्के परतावा दिला आहे. Share Market : ड्रोन निर्मिती करणाऱ्या ‘या’ कंपन्यांचे शेअर वधारणार? सरकारच्या धोरणामुळे चांगल्या परताव्याची शक्यता रिटर्न हिस्ट्री गेल्या एका वर्षात स्टॉकने सुमारे 7 ते 139.25 रुपयांपर्यंतचा प्रवास केला आहे. गेल्या 5 वर्षातील त्याची हालचाल पाहिली तर 17 फेब्रुवारी 2017 रोजी शेअरची किंमत 1.69 रुपये होती. पाच वर्षात या स्टॉकमध्ये सुमारे 8100 टक्के वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक 87.81 वरून 139.25 पर्यंत वाढला आहे. CIBIL Score वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा, कर्ज मिळवण्यासाठी कधीच अडचण येणार नाही जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.60 लाख झाले असते. जर कुणी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याच्याकडे 14.50 लाख रुपये असतील. त्याचप्रमाणे, एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्याकडे 21 लाख रुपयांची मालकी असती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमधील 1 लाख रुपयांचे शेअर्स 1.69 रुपयांच्या पातळीवर खरेदी केले असते, तर आज 1 लाख रुपये 82 लाख रुपये झाले असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात