जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Multibagger Stock: वर्षभरात 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण! तुम्हीही केली का गुंतवणूक?

Multibagger Stock: वर्षभरात 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण! तुम्हीही केली का गुंतवणूक?

Multibagger Stock: वर्षभरात 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण! तुम्हीही केली का गुंतवणूक?

Kaiser Corporation Limited हा पेनी स्टॉक गेल्या काही दिवसांपासून सतत अपर सर्किट दाखवत आहे. एका वर्षात, त्याने भागधारकांना 11,176.32 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत या शेअरची किंमत 38 पैशांवरून 42.85 रुपये झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 मार्च : पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक (Penny Stocks) करणे नेहमीच धोक्याचे असते, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या स्टॉक्सचा वॉल्युम कमी असतो आणि ते वेगाने मुव्हमेंट करतात. यासोबतच एखाद्या कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत असतील तर त्या कंपनीचे पेनी स्टॉक विकत घेता येऊ शकतात आणि ते नफा देऊ शकतात, असे मार्केट तज्ज्ञांचे मत आहे. अशा अनेक पेनी स्टॉक्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचा (Kaiser Corporation Ltd.) शेअरही असाच एक शेअर आहे, ज्याने केवळ एका वर्षात गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. हा पेनी स्टॉक गेल्या काही दिवसांपासून सतत अपर सर्किट दाखवत आहे. एका वर्षात, त्याने भागधारकांना 11,176.32 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत या शेअरची किंमत 38 पैशांवरून 42.85 रुपये झाली आहे. Kaiser Corporation Limited लेबल्स, स्टेशनरी, मासिके आणि कार्टन प्रिंटिंग मध्ये डील करते. हे त्याच्या उपकंपन्यांसोबत अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल हीट ट्रेसिंग इत्यादींमध्ये देखील व्यवहार करते. Tata ग्रुपची दमदार कामगिरी, 29 पैकी 12 स्टॉक्समध्ये 100 टक्क्यांहून अधिक रिटर्न; तुमच्याकडे आहेत का एका वर्षात बंपर परतावा 12 एप्रिल 2021 रोजी Kaiser Corporation च्या शेअरची किंमत BSE 38 पैशांवर बंद झाली. शुक्रवार 25 मार्च 2022 रोजी, त्याची किंमत प्रति शेअर रुपये 42.85 रुपयांवर पोहोचली. अशा प्रकारे या मल्टीबॅगर स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना 11,176.32 टक्के बंपर परतावा दिला आहे. जर आपण वर्ष 2022 बद्दल बोललो तर या स्टॉकमध्ये 1,367.47 ची तेजी आली आहे. त्याची किंमत 3 जानेवारी 2022 रोजी BSE वर 2.92 रुपये होती, जी आता 42.85 रुपये झाली आहे. गेल्या एका महिन्यात त्याने उत्कृष्ट परतावा दिला आहे. त्यात एका महिन्यात 125.41 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेअर बाजारात सध्या खरेदीची संधी नाही, मोठ्या घसरणीचा वाट पाहा; निखील कामत यांचा सल्ला गुंतवणूकदार बनले करोडपती जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज ही रक्कम 1.12 कोटी रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 जानेवारी 2022 रोजी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर ती गुंतवणूक आज 14.67 लाख रुपये झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाखाची गुंतवणूक केली होती, त्यांची रक्कम दुपटीने वाढून 2.25 लाख रुपये झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात