जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Mothers Day 2022: आईसाठी 'मदर्स डे'निमित्त खास फायनान्शियल गिफ्ट; भविष्यासाठी गरजांसाठी द्या आर्थिक आधार

Mothers Day 2022: आईसाठी 'मदर्स डे'निमित्त खास फायनान्शियल गिफ्ट; भविष्यासाठी गरजांसाठी द्या आर्थिक आधार

Mothers Day 2022: आईसाठी 'मदर्स डे'निमित्त खास फायनान्शियल गिफ्ट; भविष्यासाठी गरजांसाठी द्या आर्थिक आधार

अनेक ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर वैद्यकीय आणि वैयक्तिक अपघात विमा आणि इतर विशेष ऑफर देखील उपलब्ध आहेत. तुमच्या आईसाठी हे खाते उघडून तुम्ही तिला मासिक उत्पन्नाची भेट देऊ शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 मे : आज ८ मे, भारतासह जगभरात मातृदिन ( Mothers Day 2022 ) साजरा केला जात आहे. आईचे समर्पण आणि त्यागाचे स्मरण करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो. आई-वडिलांचा संघर्ष विसरू नये हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे. त्यामुळे या वेळी मदर्स डेच्या दिवशी आपल्या आईला आर्थिकदृष्ट्या मजबूत करून तिला आनंदी आयुष्याची भेट देणे आवश्यक आहे. आई आयुष्यभर आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना स्वतःकडे लक्ष देण्यास विसरते. आई स्वतःचे आरोग्य आणि आर्थिक ताकद याकडे लक्षच देत नाही. आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करताना, काही काळानंतर तिला स्वतःसाठी आधाराची आवश्यकता असते. तुम्ही भविष्यातील आर्थिक गरजांसाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल. त्याचप्रमाणे, अशा काही योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही थोडे पैसे जमा करून तुमच्या आईला मोठा आधार देऊ शकता. येथे आम्ही अशाच काही योजनांची माहिती देत आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या आईला आर्थिक बळ तर देऊ शकता शिवाय तुमचा भारही हलका करू शकता. Multibagger Stock : वर्षभरात एक लाख बनले 30 लाख! ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही सरकार समर्थित बचत योजना आहे. ही योजना 60 वर्षांवरील लोकांसाठी आहे. ही योजना अवघ्या 5 वर्षात मॅच्युअर होते. मॅच्युरिटीनंतर ती आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येते. या खात्यावर इतर योजनांपेक्षा जास्त व्याज मिळते. या योजनेअंतर्गत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते. अनेक ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर वैद्यकीय आणि वैयक्तिक अपघात विमा आणि इतर विशेष ऑफर देखील उपलब्ध आहेत. तुमच्या आईसाठी हे खाते उघडून तुम्ही तिला मासिक उत्पन्नाची भेट देऊ शकता. आरोग्य विमा वृद्धापकाळात वैद्यकीय गरजा वाढतात. महागाईच्या काळात महानगरात साधा तापही हजार रुपयांत बरा होत नाही. आजारपणाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा झाला आहे. अशा परिस्थितीत तुमच्या पालकांसाठी वैद्यकीय विमा ही एक मोठी शक्ती आहे. तुमच्या आईचा वैद्यकीय विमा नसेल तर लगेच पॉलिसी काढून घ्या. किमान 5 ते 7 लाख रुपयांचा वैद्यकीय विमा असणे आवश्यक आहे. म्हणूनच, यावेळी मातृदिनाच्या दिवशी, तुम्ही तुमच्या आईला तिच्या आरोग्याच्या रक्षणासाठी भेट देऊ शकता. LIC IPO: एलआयसीचे शेअर तुम्हाला मिळाले का नाही कधी कळणार? शेअर अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार? इमर्जन्सी फंड पालकांसाठी इमर्जन्सी फंडही ठेवला पाहिजे. यामध्ये पालकांच्या मासिक खर्चानुसार किमान तीन महिन्यांचा निधी असावा. हा निधी बचत खात्यात किंवा एफडीच्या स्वरूपातही असू शकतो. कारण ही अशी माध्यमे आहेत जी गरजेच्या वेळी लगेच वापरता येतात. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक बहुतेक महिलांना सोन्याच्या दागिन्यांची आवड असते. पण महागाईच्या काळात तुम्ही कोणाला सोन्याचे दागिने भेट देऊ शकत नाही आणि कुठलाही दागिना विकत घेतला तर त्याच्या सुरक्षेची चिंता आहेच. त्यामुळे यावेळी धातूच्या सोन्याऐवजी तुम्ही तुमच्या आईला डिजिटल सोने भेट देऊ शकता. यासाठी, तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँड्स (SGB) मध्ये गुंतवणूक करून आईला एक बाँड भेट देऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात