मराठी बातम्या /बातम्या /मनी /गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घ्या

गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घ्या

गुंतवणुकीबाबत लोक थोडे बायस्ड असतात आणि ते निर्णयाला प्रभावित करतात.

गुंतवणुकीबाबत लोक थोडे बायस्ड असतात आणि ते निर्णयाला प्रभावित करतात.

गुंतवणुकीबाबत लोक थोडे बायस्ड असतात आणि ते निर्णयाला प्रभावित करतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई: बरेच लोक शेअर बाजारात किंवा एसआयपीमध्ये गुंतवणूक करतात. पण तुम्ही जेव्हा गुंतवणूक करण्याचा निर्णय घेता तेव्हा तो निर्णय विचारपूर्वक घेता की मनाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने घेता?

    हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे अनेक गुंतवणूकदार त्यांचं प्रोफाईल बनवताना आपल्या मनाचं ऐकतात. पण अशा गुंतवणुकी पूर्वग्रहाने दूषित असतात. झी बिझनेसने दिलेल्या वृत्तानुसार गुंतवणुकीबाबत लोक थोडे बायस्ड असतात आणि ते निर्णयाला प्रभावित करतात. अशा परिस्थितीत गुंतवणुकीपूर्वी कोणते पूर्वग्रह स्वतः वर वरचढ ठरू देऊ नयेत हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी फिनफिक्सच्या संस्थापक प्रबलीन बाजपेयी यांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

    गुंतवणुकीत पूर्वग्रह

    वर्तनात्मक पूर्वग्रह गुंतवणुकीचा एक पैलू

    अनेक पूर्वग्रहांवर आधारित गुंतवणुकीचे निर्णय घेणं

    गुंतवणूक निर्णयांवर परिणाम करणारे समज

    भावना किंवा संज्ञानात्मक त्रुटी गुंतवणुकीवर वरचढ ठरतात.

    रीसेन्सी बायस

    मागच्या 6 महिन्यांचे किंवा 1 वर्षाचे रिटर्न पाहून गुंतवणूक करणं.

    स्कीमला फक्त मागच्या वर्षभराच्या प्रदर्शनावर परखणं.

    नव्या पिढीमध्ये रीसेन्सी बायस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

    गुंतवणुकीच्या निर्णयात जोखिमेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.

    रोलिंग रिटर्न पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणं योग्य.

    मागच्या काळातील फक्त चांगल्या नाही तर वाईट रिटर्नचा डेटाही एकदा तपासून घ्या.

    लॉस इव्हर्जन

    पैसे गमावण्याचं दुःख पैसे मिळण्याच्या आनंदापेक्षा जास्त

    लॉस इव्हर्जन पोर्टफोलियोला कंझर्व्हेटिव्ह बनवतो.

    नुकसानाच्या भीतीने गुंतवणूकदार SIP थांबवतात.

    फक्त एका स्कीमच्या चांगल्या प्रदर्शनामुळे पोर्टफोलियो बदलू नका.

    फॅमिलिएरिटी बायस

    कोणत्याही प्रकारच्या एकाच गुंतवणुकीवर ठाम राहा.

    वर्षानुवर्षे एकाच कॅटेगरी किंवा अॅसेट क्लेममध्ये गुंतवणूक करणं

    डायव्हर्सिफिकेशनसाठी चांगलं नाही.

    जुन्या पिढीच्या गुंतवणुकदारांमध्ये प्रमाण जास्त

    अॅसेट अॅलोकेशनच्या आधारावरच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

    मेंटल अकाउंटिंग

    वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळालेल्या पैशांना वेगळी ट्रीटमेंट द्या.

    टॅक्स रिफंड, बोनसचे पैसे जोखमीच्या अॅसेटमध्ये लावणं.

    कोणतही लक्ष्य नसताना स्पेकुलेटिव्ह गुंतवणुकीमुळे नुकसान होण्याची भीती असते.

    तुमचं लक्ष्य ठरवूनच गुंतवणूक करा.

    फ्रेमिंग बायस

    फायनॅन्शियल प्रॉडक्टचा प्रत्येक पैलू न पडताळणं.

    फक्त एकाच प्रकारच्या माहितीवर गुंतवणूक करणं.

    फ्रेमिंग बायसमुळे मिस-सेलिंग होण्याचा धोका

    कमी माहितीच्या आधारे गुंतवणूक करणं नुकसानदायक

    योग्य पोर्टफोलिओ असेल तिथेच गुंतवणूक करा.

    कन्फर्मेशन बायस

    एकाच तथ्यावर आधारित सर्व निर्णय घेणं.

    कोणत्याही एकाच प्रकारच्या इव्हेंटवर गुंतवणुकीचे निर्णय घेणं.

    बाजाराची नेमकी हालचाल कळू शकत नाही.

    First published:
    top videos

      Tags: Share market, Stock Markets