जाहिरात
मराठी बातम्या / मनी / फोन चोरीला गेल्यानंतर बँकिंग फ्रॉडपासून वाचण्याठी नक्की करा 'हे' काम

फोन चोरीला गेल्यानंतर बँकिंग फ्रॉडपासून वाचण्याठी नक्की करा 'हे' काम

फोन चोरीला गेल्यानंतर बँकिंग फ्रॉडपासून वाचण्याठी नक्की करा 'हे' काम

स्मार्टफोनवर चोरांचा डोळा असतो. कधी कुठे आपला फोन चोरीला जाईल याचा नेम नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : आजकाल स्मार्टफोन चोरी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. स्मार्टफोनशिवाय आपलं पान हलत नाही. आपला सगळा डेटा स्मार्टफोनमध्ये असतो. अगदी महत्त्वाचे बँकेचे डिटेल्सही त्यामध्ये सेव्ह असतात. अशावेळी फोन चोरीला गेला तर नुकसान होतं. स्मार्टफोनवर बँकेची कामं एका क्लीकवर होतात त्यामुळे आपण बऱ्याचदा सगळा डेटा फोनमध्ये ठेवतो पण ते कधीकधी आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. स्मार्टफोनवर चोरांचा डोळा असतो. कधी कुठे आपला फोन चोरीला जाईल याचा नेम नाही. त्यामुळे अशावेळी तुम्ही बँकिंग फ्रॉडचे शिकार होऊ नये यासाठी काही गोष्टी पाळणं महत्त्वाचं आहे. जर तुमचा फोनही चोरीला गेला असेल, तर बँकिंग फसवणुकीला बळी पडू नये यासाठी काय करायचं याची ट्रिक आज आम्ही सांगणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ज्या कंपनीचं सीमकार्ड आहे त्या कंपनीच्या टेलिकॉम ऑपरेटरला तुमचा नंबर ब्लॉक करायला सांगा. त्यामुळे तुमच्या नंबरवर येणारे OTP बंद होतील आणि तो तुमच्या खात्यामध्ये छेडछाड करू शकणार नाही. त्यानंतर पोलीस तक्रार करून FIR च्या मदतीने त्याच क्रमांकाचे नवीन सिमकार्ड घ्या. हे वाचा-PF, VPF की PPF कोणती गुंतवणूक सर्वात जास्त फायद्याची? फोन चोरीला गेल्याची माहिती तुमच्या बँकेतही कळवा. तातडीने तुमची ऑनलाइन बँकिंग सेवा बंद करून घ्या. असे केल्यानं तुमच्या फोनवरून चोर तुमच्या बँकेपर्यंत पोहोचू शकणार नाही. तुमचे सगळे पासवर्ड तातडीने रिसेट करा. कारण बऱ्याचदा क्रोममध्ये पासवर्ड सेव्ह करण्याची सवय असते जी धोकादायक ठरू शकते. हे वाचा-2 वर्षात सर्वात स्वस्त झालं सोनं; यामुळे दरात मोठी घसरण, आज होणार मोठा निर्णय आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर बदला बहुतेक सायबर गुन्हेगार मोठा गुन्हा करण्यासाठी चोरीचे फोन वापरतात. अशा परिस्थितीत, खबरदारी म्हणून, फोन चोरीला गेल्यास, तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट देऊन तुमचा मोबाइल नंबर बदला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात