मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPF, VPF की PPF कोणती गुंतवणूक सर्वात जास्त फायद्याची?

EPF, VPF की PPF कोणती गुंतवणूक सर्वात जास्त फायद्याची?

National Pension Scheme: ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक, वृद्धापकाळात मिळेल पेन्शन अन् टॅक्सही वाचेल

National Pension Scheme: ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक, वृद्धापकाळात मिळेल पेन्शन अन् टॅक्सही वाचेल

EPF, VPF की PPF नेमकी कशात करावी गुंतवणूक? तीन योजनांचे फायदे आणि तोटे समजून घ्या

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : गुंतवणुकीसाठी आपण अनेक पर्याय निवडण्याचा निर्णय घेतो. मात्र योग्य गुंतवणूक केली तर त्यातून मिळणारा फायदा मोठा असतो. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी त्याची योग्य माहिती आपल्याला असणं बंधनकारक आहे. EPF, PPF आणि VPF या तीन योजनांमध्ये फरक नक्की काय आहे? यापैकी कशात पैसे गुंतवणं फायदेशील ठरू शकतं या तिघांचे फायदे आणि तोटे देखील जाणून घेणार आहोत.

नोकरदारांसाठी EPFO ची सुविधा असतो. तुमच्या बेसिकच्या १२ टक्के रक्कम ही तुमच्या सॅलरीतून आणि कंपनीकडून पैसे EPFO खात्यावर जमा केले जातात. EPF हे नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या पगारातून कापलं जातं. कोणीही पीपीएफ करू शकतो, मग तो काम करत असो वा नसो. त्याचप्रमाणे व्हीपीएफ ही एक ऐच्छिक योजना आहे. त्याचे वेगळे खाते नाही. यासाठी ईपीएफ खात्यातच गुंतवणूक करावी लागेल.

हे वाचा-तुमच्या EPFO खात्यावर पैसे जमा होतात की नाही कसं चेक करायचं? वापरा ही ट्रिक

EPF वर मिळालेल्या व्याजावर टॅक्समधून सूट असते. याशिवाय EPF वर व्याजदरही जास्त असतं. PPF ही सरकारी योजना आहे. यावर फिक्स रिटर्न असतं. याचा लॉकिंग कालावधी जास्त असतो. १५ वर्षांपर्यंत यामध्ये गुंतवणू करता येते. या योजनेत कोणीही पैसे गुंतवू शकतं.

वॉलेंटरी प्रोविडेंट फंड हा स्वैच्छिक भविष्य निधी आहे. हा PPF पेक्षा वेगळा असतो. यावर मिळणाऱ्या व्याजदरातही दरवर्षी बदल होत असतो. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं असू शकतं. नोकरी करणारे EPF मध्ये गुंतवणूक करतात, पण तुम्ही जास्त फंड जमा करू इच्छीत असाल तर व्हीपीएफमध्ये करू शकता. यावर जास्त व्याज मिळतं. त्यामुळे तुम्ही रिटायरमेंट फंड बनवण्यासाठी याचा वापर करू शकता.

हे वाचा-Home Loan: गृहकर्जाची परतफेड केल्यानंतरही ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर याला अडचणीत

तुम्हाला जर १५ वर्षांच्या लॉकिंग पीरिएडसाठी पैसे ठेवायचे असतील तर तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करू शकता. यावर देखील टॅक्स फ्री आहे. यावर मिळणार व्याज जास्त आहे. वीपीएफ आणि पीपीएफ दोन्हीमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल फक्त PPF ला लॉकिंग पीरिएड असल्याने पैसे काढता येत नाहीत.

First published:

Tags: Money, PPF