जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Money Mantra: तुमच्या कॉन्टॅक्टसमुळे आज होईल फायदाच फायदा; 'या' राशी होणार मालामाल

Money Mantra: तुमच्या कॉन्टॅक्टसमुळे आज होईल फायदाच फायदा; 'या' राशी होणार मालामाल

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (19 सप्टेंबर 2022) राशिभविष्य

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (19 सप्टेंबर 2022) राशिभविष्य. मेष (Aries) : कोणतंही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी तुमच्या प्रिय व्यक्तींशी चर्चा करा. कोणावरही खूप लवकर विश्वास ठेवू नका. अन्यथा तोटा होण्याची शक्यता. आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता असणं भविष्याच्या दृष्टीने उत्तम राहील. आरोग्याच्या बाबतीत तडजोड करू नका. लकी नंबर : 1 लकी कलर : Green उपाय : श्री दुर्गामातेला लाल ओढणी अर्पण करा. वृषभ (Taurus) : खूप मोठ्या प्रयत्नांमुळे उद्योग-व्यवसायाचं स्थान मजबूत होईल. प्रिय व्यक्तींशी आणि वरिष्ठांशी भेट होऊ शकेल. कुटुंबीयांचा सपोर्ट घरात राहील. जमीन-इमारत आदी बाबींमधून आर्थिक लाभांची शक्यता. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. लकी नंबर : 9 लकी कलर : Red उपाय : छोट्या मुलींना खीर खाऊ घाला. मिथुन (Gemini) : परस्पर नातेसंबंध दृढ होतील. कामाच्या ठिकाणी नेतृत्वगुण वाढीला लागेल. त्यातून आर्थिक प्रगती होईल. दैनंदिन जीवनात नियम पाळा, शिस्त राखा. कुटुंबीयांना सपोर्ट मिळेल. पैसे मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करा. लकी नंबर : 0 लकी कलर : Orange उपाय : केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. कर्क (Cancer) : शहाणपणाने, विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्हाला यश नक्की मिळेल. खर्चांवर नियंत्रण ठेवा. अन्यथा कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल. तुम्ही ऊर्जा आणि उत्साहाने भारलेले असाल. मोठा विचार करा. लकी नंबर : 8 लकी कलर : Golden उपाय : सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या. सिंह (Leo) : भौतिक गोष्टींवर लक्ष असेल. अति हाव तुम्हाला कर्जाच्या खाईत लोटू शकते, हे लक्षात घ्या. पूर्ण विश्वास ठेवून कोणतंही काम करा. कौटुंबिक प्रकरणांमध्ये प्रतिष्ठा जपली जाईल. लकी नंबर : 2 लकी कलर : Purple उपाय : लक्ष्मीमातेला कमळाचं फूल अर्पण करा. कन्या (Virgo) : प्रत्येकाशी सलोखा वाढवणं करिअर आणि बिझनेसमध्ये फायद्याचं ठरेल. संवाद अधिक चांगला होईल. त्यातून पैसे मिळवण्याच्या आणखी नव्या संधी मिळतील. भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. भावा-बहिणींशी जवळीक वाढेल. लकी नंबर : 6 लकी कलर : White उपाय : तेलापासून तयार केलेली इमरती काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. तूळ (Libra) : आज तुमचा आत्मविश्वास सर्वोच्च पातळीवर असेल. कुटुंबीयांचा पाठिंबा कायम राहील. सर्व बाजूंनी चांगल्या बातम्या मिळतील. आयुष्यात एक भव्यता अनुभवता येईल. संपत्ती प्रॉपर्टीच्या कामांशी संलग्न असेल. सर्वांमध्ये समानतेची भावना राखा. लकी नंबर : 9 लकी कलर : Black उपाय : शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तीची सेवा करा. वृश्चिक (Scorpio) : कोणत्याही गोष्टीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची समज वाढेल. जीवनशैली सुधारेल. त्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील. करिअरमध्ये चांगल्या ऑफर्स मिळतील. आर्थिक कृतींना बळ मिळेल. प्रिय व्यक्तींसोबत संस्मरणीय क्षण व्यतीत कराल. लकी नंबर : 8 लकी कलर : Blue उपाय : मुंग्यांसाठी पीठ आणि साखरेचं मिश्रण तयार करून ठेवा. धनू (Sagittarius) : कोणत्याही लोभाला बळी पडू नका. त्यातून तोटा होण्याची शक्यता आहे. धोरणं, नियम, तत्त्वं पाळा. नातेवाईकांचा आदर राखला जाईल. संस्कृतीला प्रोत्साहन दिलं जाईल. पारंपरिक कामामध्ये व्यग्र व्हाल. प्रिय व्यक्तींकडून सल्ला घ्याल. लकी नंबर : 6 लकी कलर : Pink उपाय : माशांना खाऊ घाला. मकर (Capricorn) : आजचा दिवस चांगला आहे. आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली तुमचा मार्ग सुकर होईल. नफा मिळवण्याचे नवे मार्ग दिसतील. क्षुद्र मोहापासून स्वतःला लांब ठेवा. अन्यथा तुमच्यावर कसला तरी आरोप होण्याची शक्यता आहे. कुटुंबातलं वातावरण सुखद असेल. लकी नंबर : 4 लकी कलर : Green उपाय : आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. कुंभ (Aquarius) : घरात प्रेम आणि समजूतदारपणाचं दर्शन होईल. तुम्हा काम करत असलेल्या प्रोजेक्टमध्ये, रिसर्चमध्ये यशस्वी व्हाल. नशीब तुम्हाला साथ देईल. बिझनेसशी संबंधित व्यक्तींना पैसे मिळतील. आज तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल. लकी नंबर : 2 लकी कलर : Blue उपाय : गायीला हिरवा चारा खाऊ घाला. मीन (Pisces) : आजचा दिवस अनुकूल ठरेल. प्रलंबित राहिलेलं तातडीचं काम आज सहजपणे पूर्ण होईल. परस्परांवरच्या विश्वासामुळे कौटुंबिक नातेसंबंध दृढ होतील. उत्पन्न चांगलं असेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. तातडीने यश मिळण्यासाठी चुकीच्या कृतींना खतपाणी घालू नका. लकी नंबर : 8 लकी कलर : Brown उपाय : श्री लक्ष्मीमातेची पूजा करा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात