मराठी बातम्या /बातम्या /मनी /केवळ 20 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला होईल 4 लाखांची कमाई

केवळ 20 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला होईल 4 लाखांची कमाई

अनेकांना नोकरीच्या बंधनात अडकण्याची इच्छा नसते. नोकरीऐवजी त्यांना व्यवसायामध्ये (Business) जास्त रस असतो; मात्र व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला भांडवली गुंतवणूक (Investment) आवश्यक असते. त्यामुळं सर्वसाधारण आर्थिक स्थिती असलेल्या व्यक्तींना व्यवसायाची इच्छा पूर्ण करता येत नाही. अशा व्यक्तींसाठी कमी आर्थिक गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

पुढे वाचा ...

   मुंबई, 10 नोव्हेंबर-   अनेकांना नोकरीच्या बंधनात अडकण्याची इच्छा नसते. नोकरीऐवजी त्यांना व्यवसायामध्ये (Business) जास्त रस असतो; मात्र व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला भांडवली गुंतवणूक (Investment) आवश्यक असते. त्यामुळं सर्वसाधारण आर्थिक स्थिती असलेल्या व्यक्तींना व्यवसायाची इच्छा पूर्ण करता येत नाही. अशा व्यक्तींसाठी कमी आर्थिक गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हालाही कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम बिझनेस आयडिया (Business Idea) घेऊन आलो आहोत. कमीत कमी पैसे गुंतवून तुम्ही याची सुरुवात करू शकता. ही स्वस्त आणि मस्त बिझनेस आयडिया 'लेमन ग्रास फार्मिंग'ची (Lemon Grass Farming) आहे. लेमन ग्रासला आपण गवती चहा या नावानं ओळखतो. लेमन ग्रासच्या शेतीमधून लाखो रुपयांचा नफा (Profit) मिळवता येऊ शकतो आणि तेही केवळ 15 ते 20 हजार रुपयांची गुंतवणूक करून.

  बाजारात मोठी मागणी

  लेमन ग्रासमध्ये (Lemon Grass) औषधी गुणधर्म (Medicinal properties) असल्यामुळे त्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चहामध्ये किंवा आयुर्वेदिक काढ्यामध्ये लेमन ग्रासचा वापर केला जातो, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. याशिवाय त्यातून काढल्या जाणाऱ्या तेलालाही बाजारात मोठी मागणी आहे. लेमन ग्रासपासून काढलेलं तेल (Lemon Grass Oil) कॉस्मेटिक्स (Cosmetics), साबण, तेल आणि औषधं बनवणाऱ्या कंपन्या वापरतात. यामुळे लेमन ग्रासला बाजारात चांगला भाव मिळतो. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुष्काळग्रस्त भागातही त्याची लागवड करता येते. लेमन ग्रासच्या केवळ एक हेक्‍टर क्षेत्रावरच्या लागवडीतून तुम्हाला वर्षाला साधारण 4 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो.

  लेमन ग्रासची शेती

  लेमन ग्रासची लागवड करण्यासाठी फेब्रुवारी ते जुलै महिन्यादरम्यानचा कालावधी सर्वोत्तम मानला जातो. एकदा लागवड केल्यानंतर त्याची एकूण सहा ते सात वेळा, तर वर्षातून तीन ते चार वेळा कापणी करता येते. लेमन ग्रास लावल्यानंतर 3 ते 5 महिन्यांनी त्याची पहिली कापणी केली जाते. एक एकर जमिनीवरच्या लेमन ग्रास लागवडीतून 5 टनांपर्यंत पाती मिळू शकतात. लेमन ग्रासपासून तेल काढलं जातं. एका वर्षात एक कठ्ठा (एक कठ्ठा म्हणजे साधारणतः हेक्टरचा विसावा भाग) जमिनीवरच्या लागवडीतून जवळपास 3 ते 5 लिटर तेल निघतं. तेलाच्या विक्रीसाठी साधारण प्रति लिटर 1000 ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळतो. 15 ते 20 हजार रुपयांमध्ये तुम्ही त्याची लागवड करू शकता. तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर तुम्ही कापणीसाठी मशीनही वापरू शकता. 2 ते 2.5 लाख रुपयांमध्ये मशिनचा सेटअप करता येतो.

  (हे वाचा: 14,500 रुपयांची गुंतवणूक करून उभा करा 23 कोटींचा फंड, वाचा सविस्तर )

  अशी होईल कमाई

  लेमन ग्रासच्या लागवडीतून तुम्हाला इतर पिकांच्या तुलनेत लवकर उत्पन्न मिळतं. एक क्विंटल लेमन ग्रासपासून एक लिटर तेल निघतं. बाजारात त्याची किंमत 1000 ते 1500 रुपयांपर्यंत आहे. म्हणजेच पाच टन लेमन ग्रासपासून तुम्हाला किमान 3 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो. लेमन ग्रासच्या पाती विकूनही तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. बिहारमधले रोनक कुमार आणि रमण कुमार हे दोन भाऊ मिळून लेमन ग्रासची शेती करतात. दोघेही त्यापासून सुका चहा तयार करतात आणि देशभर त्याची विक्री करतात. यातून त्यांना दरमहा 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.सारासार विचार करता लेमन ग्रासची शेती सोपी आणि फायद्याची आहे. कमी जमीन आणि कमी पाणी असलेले शेतकरीदेखील याची लागवड करू शकतात.

  First published:
  top videos

   Tags: Business, Money