मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मंदीचं सावट आहे. दुसरीकडे भारतात महागाई देखील वाढत आहे. अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे गव्हाचं पिक यंदा कमी आलं आहे. त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतोय. गहू आणि गव्हाचं पीठ महाग झालं आहे. त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. गव्हाच्या किंमती कमी करण्यासाठी मोदी सरकारने प्लॅन तयार केला आहे.
महागाई वाढत असताना गव्हाचे दर घसरण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारात ३० लाख टन गहू विकण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे गहू आणि गव्हाच्या पिठाचे दर किलोमागे ४ ते ६ रुपयांनी कमी होऊ शकतात, असे व्यापारी आणि बाजारपेठेतील सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, गहू आणि त्याच्या पिठाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने बुधवारी आपल्या बफर स्टॉकमधून 30 लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची घोषणा केली. भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) माध्यमातून येत्या दोन महिन्यांत विविध माध्यमातून या गव्हाची विक्री केली जाणार आहे.
23 ते 29 रुपयांपर्यंत गहू विकला जाईल याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तर गव्हाचं पिठ तयार करणाऱ्यांना हा गहू कमी किंमतीमध्ये देण्याकडे सरकारचा कल असणार आहे. ज्यामुळे पिठाच्या किंमतीही फार जास्त वाढणार नाहीत.
गव्हाच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे आणि 2023-24 (एप्रिल ते मार्च) साठी दर 21.25 रुपये प्रति किलो च्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त राहतील. गव्हाचं उत्पादन कमी असल्याने पुढचा साठा भरुन काढण्यात सरकारला अडचणी येण्याची शक्यता असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Infatuation, Modi government, Money