असीम मनचंदा, प्रतिनिधी नवी दिल्ली: तुम्ही एखाद्या खाद्यपदार्थ गोळी किंवा आवश्यक असणारी वस्तू विकत घेतली की पटकन त्यावरची आधी एक्सपायरी डेट पाहता. तशी एक्सपायरी डेट अजून तरी मोबाईल किंवा त्याच्या पार्टसाठी देण्यात आली नाही. मात्र इथून पुढे तुमच्या मोबाईलसाठी एक एक्सपायरी डेट निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. मोबाइल हँडसेट किंवा कन्झ्युमर ड्युरेबल्स (फ्रीज-टीव्ही) वस्तू खरेदी केल्यास त्यावर एक्स्पायरी डेटही लिहिली जाईल. CNBC ने दिलेल्या माहितीनुसार ऑटोमोबाईल कंपन्यांना लवकरच उत्पादनावर आपल्या उत्पादनांची एक्स्पायरी डेट लिहावी लागणार आहे. एक्सपायरी डेटपर्यंत ग्राहकांना त्या उत्पादनाशी संबंधित सुटे भाग मिळणार आहेत. यासाठी सरकार एक खास वेबसाइटही देखील तयार करत आहे. त्यासंबंधित सध्या चर्चा सुरू आहेत. राइट टू रिपेअर होणार बंधनकारक राईट टू रिपेअर सरकार बंधनकारक करण्याच्या तयारीत आहे. मोबाइल हँडसेट, कन्झ्युमर ड्युरेबल्स, ऑटोमोबाइल कंपन्या आणि कृषी उपकरणे यांनाही हा नियम लागू केला जाण्याची शक्यता आहे.
रिफंडच्या नादात पैसे गमावून बसतायत मुंबईकर, फसवणूक कशी टाळायची?उत्पादनांचे सुटे भाग कधी उपलब्ध होतील, हे कंपन्यांना सांगावे लागणार आहे. याशिवाय सर्व्हिस सेंटर कधी सुरू असणार याची माहिती देणंही बंधनकारक असणार आहे. याचा सर्वसामान्य लोकांना मोठा फायदा होणार आहे. दोन ते तीन महिन्यात वेबसाइट लाँच केली जाण्याची शक्यता आहे. ही सेवा किती काळ उपलब्ध असेल हे कंपन्यांना सांगावे लागेल. कंपन्यांना त्यांच्या सेवा केंद्राची माहिती द्यावी लागणार आहे. कंपन्यांना स्व-दुरुस्तीसाठी मॅन्युअल्स द्यावी लागतील. एक्सपायरी डेटशी संबंधित महत्त्वाची माहिती द्यावी लागणार आहे. एखाद्या उत्पादनावर एक्सपायरी डेट लिहिली असेल तर ती तारीख संपल्यानंतर ते उत्पादन वापरासाठी योग्य ठरत नाही याची माहिती देखील द्यावी लागणार आहे.
क्रेडिट कार्ड वापरता सावधान! तुमच्यासोबतही हे घडू शकतंबऱ्याचवेळा प्रोडक्टवर युज बाय डेट असं लिहिलेलं असतं, रेडी-टू-इट कोशिंबीर, दूध किंवा मीड उत्पादने यासारख्या त्वरीत खराब होऊ शकणाऱ्या उत्पादनांबाबत हे घडते. त्यांच्या विशेष काळजी घ्यावी लागते. देशातील ब्रेड, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांवरच तारखेनुसार वापर छापला जातो. पॅकेज्ड फूडसाठी भारत ही आशियातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.