जाहिरात
मराठी बातम्या / मनी / या जुन्या नाण्यांसाठी लागतेय लाखोंची बोली; जर तुमच्याकडेही हे नाणं असेल तर मिळतील 25 लाख

या जुन्या नाण्यांसाठी लागतेय लाखोंची बोली; जर तुमच्याकडेही हे नाणं असेल तर मिळतील 25 लाख

या जुन्या नाण्यांसाठी लागतेय लाखोंची बोली; जर तुमच्याकडेही हे नाणं असेल तर मिळतील 25 लाख

देशात असे अनेक लोकं आहेत, ज्यांना जुनी नाणी (Old coins) गोळा करायला आवडतं. संबंधित नाण्याबाबत त्यांच्या काही श्रद्धा जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे संबंधित नाणी मिळवण्यासाठी ही लोकं कितीही पैसा मोजायला तयार असतात. कारण गेल्या काही काळापासून ई-कॉमर्स साइटवर (E Commerce sites demand rise for old coins) विशेष नाण्यांची मागणी वाढली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 मार्च: देशात असे अनेक लोकं आहेत, ज्यांना जुनी नाणी गोळा करायला आवडतं. संबंधित नाण्याबाबत त्यांच्या काही श्रद्धा जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे संबंधित नाणी मिळवण्यासाठी ही लोकं कितीही पैसा मोजायला तयार असतात. कारण गेल्या काही काळापासून ई-कॉमर्स साइटवर विशेष नाण्यांची मागणी वाढली आहे. तुमच्याकडे जर 1, 5 आणि 10 रुपयांच विशेष नाणं असेल, तर तुम्ही एका झटक्यात लखुपती बनू शकता. सध्या या नाण्यांची ई-कॉमर्स साइटवर चांगलीच मागणी वाढली असून त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी ग्राहकांनी दाखवली आहे. वैष्णोदेवीचं चित्रं असलेल्या 5 आणि 10 रुपयांच्या मागणीत वाढ मीडिया रिपोर्ट्स नुसार, सध्या ई-कॉमर्स साइटवर वैष्णो देवीचं चित्र असलेल्या 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची विशेष मागणी वाढली आहे. त्यामुळे हे नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही एका झटक्यात लखुपती बनू शकता. 2002 साली या नाण्यांची निर्मिती करण्यात आली होती. या नाण्यावर वैष्णोदेवीचा फोटो असल्याने या नाण्याला अनेकजण शुभ नाणं समजत आहेत. हिंदू धर्मात वैष्णोदेवीला पुजलं जातं, त्यामुळे या नाण्याला चांगलीच मागणी आहे. जर तुमच्याकडे अशाप्रकारचं नाणं असेल तर तुम्ही त्या नाण्याचा ऑनलाइन पद्धतीने लिलाव करू शकता. (हे वाचा- शरद पवार आणि अमित शहांची भेट झाली का? राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया ) 1 रुपयाचं नाणं 1913 साली जारी केलेल्या 1 रुपयांच्या नाण्यालाही प्रचंड मागणी वाढली आहे. हा विशेष रुपया तुमच्याकडे असेल तर तुम्हाला घरी बसून किमान 25 लाख रुपये आरामात मिळू शकतील. खरंतर हा रुपया 100 वर्षाहून अधिक जुना असून हे नाणं चांदीच्या धातूने बनवलं होतं. शिवाय आता या नाण्याचा व्हिक्टेरियन वर्गवारीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बाजारात या नाण्याला प्रचंड मागणी वाढली आहे. पण हा रुपया खूप दुर्मिळ आहे. या वेबसाइट्सवर ऑनलाइन पद्धतीने नाण्याची विक्री करू शकता https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/ http://www.indiancurrencies.com/ (हे वाचा- 56 लाख रुपयांना विकलं गेलं जवळपास एक तोळं सोन्याचं नाणं; इतकं काय आहेत त्यात खास ) तत्पूर्वी तुम्हाला तुमची प्रोफाइल तयार करावी लागेल तुम्ही इंडियामार्टच्या वेब साइटवर या नाण्यांची विक्री करू शकता. याठिकाणी बरेच लोकं अशा नाण्यांचा शोध घेत आहेत. तत्पूर्वी आपल्याला या साइटवर जाऊन केवळ आपला लॉग इन आयडी तयार करावा लागेल. त्यानंतर संबंधित नाण्याचा फोटो अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्यांना तुमच्याकडील नाणं हवं आहे, ते तुमच्याशी संपर्क साधतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात