कच्च्या तेलाच्या किमती, जे प्रति बॅरल USD 120 च्या जवळ आहेत, ही भारतीय बाजारासाठी मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर बाजाराची नजर राहणार आहे.
मुंबई, 6 मार्च : रशिया-युक्रेन युद्धाचे (Russia-Ukraine War) निकाल, जागतिक शेअर बाजारातील कल (Global Market), तेलाच्या किमती (Crude Oil Price) आणि विधानसभा निवडणुकांवर (Assembly Election) या आठवड्यात शेअर बाजाराची वाटचाल अवलंबून असेल. याशिवाय गुंतवणूकदार चीन आणि अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीवरही लक्ष ठेवतील, असे विश्लेषकांनी सांगितले.
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणाले, “भू-राजकीय अनिश्चितता अजूनही कायम आहे. याशिवाय 10 मार्चला विधानसभा निवडणुकीचे निकालही देशांतर्गत महत्त्वाचे आहेत. याशिवाय 10 मार्च रोजी अमेरिकेतील चलनवाढीचा डेटा जाहीर केला जाईल, ज्यावर जागतिक बाजारांचेही निरीक्षण केले जाईल.
Petrol Diesel Prices Today: IOCL कडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा 1 लीटरचा लेटेस्ट रेटकच्च्या तेलाच्या किमतीचे मोठे संकट
ते पुढे म्हणाले की, वस्तूंच्या किमती वाढत आहेत. विशेषतः कच्च्या तेलाच्या किमती, जे प्रति बॅरल USD 120 च्या जवळ आहेत, ही भारतीय बाजारासाठी मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर बाजाराची नजर राहणार आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल १० मार्चला
रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा म्हणाले की, या आठवड्यात रशिया-युक्रेन संकट आणि कच्च्या तेलावरील त्याचा परिणाम यावर लक्ष केंद्रित केले जाईल. याशिवाय, देशांतर्गत आघाडीवर, 10 मार्च रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर सर्वांचे लक्ष असेल.
1 लाखाचे झाले 78 लाख, या स्टॉकने 5 वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल11 मार्चपर्यंत येणार IIP डेटा
याशिवाय 11 मार्च रोजी आयआयपीचे आकडेही येणार आहेत. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती आणि विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यामुळे देशांतर्गत बाजारात घसरण झाली. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 1,524.71 अंक किंवा 2.72 टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी 413.05 अंकांनी किंवा 2.47 टक्क्यांनी घसरला.
सॅमको सिक्युरिटीजच्या इक्विटी रिसर्चच्या प्रमुख येशा शाह यांनी सांगितले की, भू-राजकीय तणावामुळे बाजाराची दिशा खूप प्रभावित होईल. युद्धादरम्यान वस्तू आणि कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि चलनवाढीचा डेटा यूएस फेडरल रिझर्व्हच्या पुढील कारवाईचा मुख्य सूचक बनू शकतो.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.